बॉयफ्रेंडची हत्या करून महिलेने मृतदेहाचे केले तुकडे, त्यानंतर वडिलांसोबत केले लग्न!

Murder young woman for due to financial dispute, chembur police arrested the accused within 24 hours
आर्थिक वादामुळे तरुणानीचे तीक्ष्ण हत्याराने हत्या, २४ तासांत पोलिसांनी आरोपींना केले गजाआड

एका महिलेने बॉयफ्रेंडची हत्या करून त्याचे तुकडे केले आणि त्यानंतर वडिलांसोबत लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनियामधील आहे. या महिलेने वडिलांसोबत लग्न करण्यासाठी बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. याप्रकरणी गुरुवारी या महिलेला ४० वर्ष तुरुंगवासीची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे.

महितीनुसार, फेब्रुवारी २०१९मध्ये या महिलेने बॉयफ्रेंडची हत्या केली होती. या आरोपी महिलेचे नाव अमंडा असे असून ती त्यावेळेस ३१ वर्षांची होती आणि तिचा बॉयफ्रेंड जॉन मॅकगुरी ३८ वर्षांचा होता. अमंडाने लग्न केलेला व्यक्तीचा तिचा बायोलॉजिकल वडील आहे. ५५ वर्षीय अमंडाचे वडिलांचे लॅरी मॅकक्लूरीला ऑगस्टमध्येच या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. अमंडाने आपल्या वडिलांसोबत बॉयफ्रेंडी हत्या केली होती.

डेली मेलच्या वृत्तानुसार, बॉयफ्रेंडची हत्या केल्यानंतर अमंडाने वडिलांसोबत त्याचा मृतदेह गुपचूप पुरला होता. त्यानंतर पुन्हा मृतदेह बाहेर काढून दुसऱ्या ठिकाणी देखील त्यांनी पुरला. त्यानंतर अमंडाने बायोलॉजिकल वडिलांशी संबंध निर्माण केले. हत्येच्या ३ आठवड्यानंतर अमंडाने वडिलांसोबत लग्न केले.

दरम्यान अमंडाची ३२ वर्षीय बहीण मॅरीवर देखील हत्या केल्याचा गुन्हा दाखल आहे. कारण बहिणीच्या बॉयफ्रेंडच्या हत्येच्या कटात ती देखील सामील होती. ‘तिच्या वडिलांमुळे तिच्यावर चुकीचा परिणाम झाला होता’, असे अमंडाने कोर्टात सांगण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली की, ‘माझ्या वडिलांना माझ्याजवळ कोणाला पाहायचे नव्हते.’


हेही वाचा – सामूहिक बलात्कारानंतर पीडितेला आत्महत्या करण्यास आरोपीच्या नातेवाईकांनी केले प्रवृत्त!