रविवारी एका २२ वर्षीय गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र या महिलेला कोरोनामुळे आपल्या नवजात बाळालापासून दूर राहावे लागत आहे. ११ मार्चला कलकत्ता मधील सरकारी रुग्णालयात तिची प्रसूती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर तिची कोरोनाची चाचणी करण्यात आली आणि रविवारी तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
आता आई आणि चिमुकल्याला स्वतंत्र वेगळ्या विभागात ठेवण्यात आले आहेत. मंगळवारी या चिमुकल्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले जाणार असल्याचे रुग्णालयातील अधिकाऱ्याने सांगितले. आता आई आणि चिमुकल्याची प्रकृती स्थिर आहे. वैद्यकीय अधीक्षक आणि कलकत्त मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे उपप्राचार्य इंद्रनील विश्वास यांनी याबाबत सांगितले की, या महिलेचे ११ मार्च बाळंतपण केले. नंतर तिला ताप आला. मग आम्ही कोरोना चाचणीसाठी तिचे नमुने तपासणीकरिता पाठविले. त्यानंतर तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. आम्ही दोघांनाही स्वतंत्र विभागात आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. आम्ही आता बाळाचे नमुने पाठवणार आहोत.
यानंतर गर्भवती महिलांची आता परिस्थितीत काळजी कशी घ्यावी. यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाने सोमवारी सविस्तर गोष्टी जाहीर केल्या आहेत. गर्भवती महिलांना कोणतीही अडचण येऊ नये याकरिता आशा आणि एएनएम कर्मचाऱ्यांना तैनात केले आहेत. तसेच वैद्यकीय महाविद्यालयांना कोरोनाची लागण झालेल्या आणि संशयित असलेल्या गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र विभाग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ज्या गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाली आहे आणि ती ज्या विभागात होतील. तेथील महिलांना दुसऱ्या विभागात ठेवण्यात आले आहेत. तसेच तो विभाग निर्जंतुकीकरण्यासाठी दोन दिवस बंद ठेवण्यात आला आहे. आता सुमारे १२ नमुने चाचणीसाठी पाठविले जाणार आहेत.
रुग्णालयातील अधिकाऱ्याने सांगितलं की, आई आणि बाळाची प्रकृती स्थिर आहे. तिच्या संपर्कात आलेल्या डॉक्टर्स आणि नर्सेसची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचे निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत. सगळे कर्मचारी मास्क, पीपीई ग्लोजचा वापर करत आहे. तसेच आणखी मेडिकल स्टाफपैकी काही जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
हेही वाचा – CoronaVirus: दिल्लीत ३६५ नवे कोरोनाचे रुग्ण, त्यापैकी ३२५ निजामुद्दीन मरकजचे!