CCTV : नराधमानं कॅमेऱ्यासमोरच महिलेची केली गळा आवळून हत्या!

women strangulated in cctv camera crime news
आधी दबा धरून बसला, नंतर गळा आवळला!

एक भयंकर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंदौरमधला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये दिसत असलेला प्रकार सगळ्यांनाच धक्का देणारा आहे. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका महिलेची एक इसम गळा आवळून हत्या करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार समोरच्याच CCTV मध्ये कैद झालेला आहे. पण, त्याची एक तर या इसमाला माहितीच नसावी किंवा जाणून-बुजून त्यानं सीसीटीव्ही चालू असतानाही त्याच्या समोरच महिलेची हत्या केली असावी. या सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलीस हत्या करणाऱ्या इसमाचा शोध घेत आहेत. तसेच, संबंधित महिलेची ओळख देखील पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये?

हा व्हिडिओ म्हणजे खरंतर एका रस्त्याच्या कडेला बसवण्यात आलेल्या CCTV चं फूटेज आहे. मात्र, या सीसीटीव्हीमध्ये एक भयंकर प्रकार कैद झाल्यामुळे त्याचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. कारण या व्हिडिओमध्ये एक हत्येचा गुन्हा रेकॉर्ड झालेला आहे. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका महिलेची एक इसम गळा दाबून हत्या करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. शरद श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीने ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. आधी दबा धरून बसलेला इसम नंतर महिलेला फरफटत नेतो आणि हातातल्या वायरच्या मदतीचे तिची गळा आवळून हत्या करत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

पाहा घटनेचा संपूर्ण व्हिडिओ

भीषण! CCTV मध्ये कैद झाली हत्या! CCTV Footage Shows a Serious Incident

इंदौरमधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे खरंतर तिथल्या एका रस्त्याच्या कडेला बसवण्यात आलेल्या CCTV चं फूटेज आहे. मात्र, या सीसीटीव्हीमध्ये एक भयंकर प्रकार कैद झाल्यामुळे त्याचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. कारण या व्हिडिओमध्ये एक हत्येचा गुन्हा रेकॉर्ड झालेला आहे. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका महिलेची एक इसम गळा दाबून हत्या करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. शरद श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीने ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. आधी दबा धरून बसलेला इसम नंतर महिलेला फरफटत नेतो आणि हातातल्या वायरच्या मदतीचे तिची गळा आवळून हत्या करत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. या प्रकारानंतर पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Saturday, October 10, 2020