जम्मू काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित महिला शिक्षिकेवर गोळीबार

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir) पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी गोळीबार (Firing) केला आहे. एका काश्मीरी पंडित (Kashmiri Pandit) महिला शिक्षिकेवर शाळेत घुसून गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir) पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी गोळीबार (Firing) केला आहे. एका काश्मीरी पंडित (Kashmiri Pandit) महिला शिक्षिकेवर शाळेत घुसून गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या गोळीबारात महिला शिक्षिका (Teacher) गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कुलगामच्या गोपालपुरा (Gopal Pura of Kul gam) येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी कश्मीरी पोलिसांकडून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच, सुरक्षा दलाकडून (Security forces) संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. मात्र, या गोळीबारानंतर पुन्हा कश्मीरी पंडितांना दहशतवाद्यांकडून (Terrorists) टार्गेट केल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

हेही वाचा – Jammu Kashmir: स्फोटकांनी भरलेला ड्रोन उद्ध्वस्त करण्यात सुरक्षा रक्षकांना मोठं यश

मिळालेल्या माहितीनुसार, रजनीबल असे या महिला शिक्षिकेचे नाव असून, ही सांबा येथील रहिवासी आहे. या महिलेच्या पतीचे नाव राजकुमार आहे. रजनीबल या महिला शिक्षिकेची ड्युटी गोपालपुरा येथे सुरू होती. या प्राणघातक गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व दहशतवाद्यांचा लवकरच शोध घेऊन त्यांचा खात्मा केला जाणार असल्याचे पोलिसांनी (Police) सांगितेल आहे. या घटनेची माहिती काश्मीर पोलिसांनी ट्विट करत दिली. या घटनेवर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रेही जप्त

जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) अवंतीपोरा येथे आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली असून लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठन्सान घालण्यात यश मिळालं आहे. तसेच त्यांच्याकडून दोन AK-47 या रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. शाहीर राथेर आणि उमर युसूफ अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. चकमकीची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

शाहिदचा अरिपाल येथील शकीला नावाच्या महिलेच्या आणि लुर्गम त्राल येथील सरकारी कर्मचारी जाविद अहमद यांच्या हत्येत सहभाग होता, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार यांनी सांगितले. भारतीय सुरक्षा दल शोध मोहीम राबवत असताना लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. चकमक संपल्यानंतर सुरक्षा दलांकडून शोध मोहीम राबवली जात आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी अवंतीपोरा येथील राजपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्रालचा रहिवासी शाहिद राथेर आणि शोपियानचा रहिवासी उमर युसूफ अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे असून त्यांची ओळख पटली आहे.


हेही वाचा – Gyanvapi Case: ज्ञानवापी प्रकरणात न्यायालयात पक्षकार होण्याची स्पर्धा, निर्मोही आखाड्यासह या संघटनांचा अर्ज, 4 जुलैला सुनावणी