घर देश-विदेश नोकरीच्या आमिषानं महिलेची रियादला तस्करी?

नोकरीच्या आमिषानं महिलेची रियादला तस्करी?

Subscribe

रियादमध्ये नोकरी देण्याच्या आमिषानं हैद्राबादमधील तरूणीची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान तरूणीच्या कुटुंबियांनी आता सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली आहे.

परदेशात नोकरीच्या आमिषानं अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना आपल्यााला माहित आहेत. केव्हा एजंटकडून तर केव्हा ओळखीच्याच व्यक्तीकडून फसवणूक होते. बऱ्याच वेळा नोकरी सांगितली जाते एक पण, परदेशात गेल्यानंतर मात्र वास्तवता पाहून आपली फसवणूक झालीय ही गोष्ट ध्यानात येते. या गोष्टी काही नवीन नाहीत. हैद्राबादमधील एका तरूणीची देखील परदेशामध्ये ब्युटी पार्लरमध्ये काम देण्याच्या बहाण्यानं फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या साऱ्या प्रकरणामध्ये तरूणीच्या आईनं आणि भावानं पोलिस ठाण्यात धाव घेतली असून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे देखील मदतीची याचना केली आहे. रियादमध्ये नोकरी देण्याच्या निमित्तानं दोन एजंटकडून पीडित तरूणीची फसवणूक झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?

हलीम उन्नीसा असं या फसवणूक झालेल्या तरूणीचं नाव आहे. मार्च २०१७ साली उन्नीसा रियादला गेली. रियादमध्ये उन्नीसाला ब्युटी पार्लरमध्ये काम लावतो अशी बतावणी दोन एजंटकडून केली गेली. त्यांच्यावर विश्वास ठेवून उन्नीसा रियादला गेली. पण, तिथे पोहोचल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची जाणीव उन्नीसाला झाली. ब्युटी पार्लरमध्ये काम देण्याऐवजी तिला घरकामाला लावले. शिवाय तिला मानसिक त्रास देखील दिला गेला. याप्रकरणी उन्नीसाच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच सरकारकडं देखील उन्नीसाच्या कुटुंबियांनी मदत मागितली आहे.

- Advertisement -

रियादला गेल्यानंतर तुला दर महिना २५ हजार रूपये पगार दिला जाईल अशा बतावणी देखील या दोन्ही एजंटकडून केली गेली. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी होती. आम्ही दोन्ही एजंटला यासंदर्भात विचारणा केली. पण, त्यांच्याकडून देखील कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. दरम्यान, हलीम उन्नीसाच्या कुटुंबियांनी आता सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीचा हात मागितला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -