घरCORONA UPDATEधक्कादायक! कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेताना थेट मेंदूच्या नसीला पडलं छिद्र!

धक्कादायक! कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेताना थेट मेंदूच्या नसीला पडलं छिद्र!

Subscribe

कोरोनाचा कहर देशभरात सुरू झाल्यापासून देशात आजपर्यंत लाखो टेस्ट करण्यात आल्या आहेत. कोरोनाची चाचणी (Corona Test) करण्यासाठी नाकातून आणि घशातून स्वॅबचे नमुने घ्यावे लागतात. त्यानंतर त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काढता येतात. मात्र, असे स्वॅब घेताना काही केसेसमध्ये इन्फेक्शन किंवा इतर इजा झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. नुकताच असाच एक प्रकार समोर आला असून त्यामध्ये एका महिलेच्या नाकातून स्वॅबचा नमुना घेताना तिच्या मेंदूपर्यंत जाणाऱ्या एका नसीलाच छिद्र पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची चाचणी करण्यासाठी स्वॅब नमुने घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी अधिक सतर्कता घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. जगभरातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हा एक धडा ठरावा असं देखील सांगितलं जात आहे. वर्ल्ड न्यूज वननं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

स्वॅब घेताना नाकात जाणीव होतेच, मग?

हा सगळा प्रकार घडला अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये! एक ४० वर्षीय महिला एका रुग्णालयात कोरोनाची चाचणी करून घेण्यासाठी दाखल झाली होती. या महिलेचा आधीही दुसऱ्या एका चाचणीसाठी नाकातून स्वॅब घेण्यात आला होता. तेव्हा सारंकाही सुरळीत झालं. मात्र, कोरोनासाठी स्वॅब घेताना संबंधित आरोग्य कर्मचाऱ्याने स्वॅब स्टीक नाकात जास्त आतपर्यंत टोचल्याचं महिलेला जाणवलं. मात्र, सामान्यपणे स्वॅब घेताना नाकात स्टीक टाकली जात असल्यामुळे हे देखील अशा वेळी जाणवणारं सामान्य लक्षणच होतं. मात्र, काही काळाने नाकातून एक द्राव बाहेर येत असल्याची तक्रार सुरू झाल्याने जेव्हा ही महिला पुन्हा रुग्णालयात गेली, तेव्हा खरा प्रकार समोर आला.

- Advertisement -
Corona test
प्रातिनिधिक फोटो

मेंदूची नस नाकाजवळ दाबली गेली होती…

ही महिला पुन्हा रुग्णालयात आल्यानंतर तिची मेडिकल हिस्ट्री अर्थात याआधी तिच्यावर झालेल्या सर्जरींची माहिती घेण्यात आली. तेव्हा, मेंदूला आवश्यक द्राव पुरवणाऱ्या नसांमध्ये अशा द्रव्य पदार्थाचा दाब जास्त असल्याची काही वर्षांपूर्वी तिला तक्रार असल्याचं समजलं. यासंदर्भातली तिची सर्जरी झाली होती. मात्र, ही सर्जरी करताना ही नस नाकाच्या बाजूला दाबली गेली होती. इतक्या वर्षांत त्याचा काहीही त्रास जाणवला नव्हता. यावेळी कोरोनासाठी स्वॅबचा नमुना घेताला नाकाजवळ आलेली ही नस स्वॅब स्टीकने दाबली गेली आणि त्यात छिद्र पडलं!

तर मेंदूत हवा शिरली असती!

हा प्रकार समजल्यानंतर लागलीच डॉक्टरांनी त्यावर उपचार सुरू केले आणि या नसीची पुन्हा सर्जरी केली. ही सर्जरी वेळीच झाली नसती, तर त्या छिद्रातून मेंदूत हवा जाण्याचा किंवा हा द्राव श्वसन प्रणालीमध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाला असता, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -