घरदेश-विदेशएअरफोर्समध्ये आता महिला फायटर पायलट होणार परमनंट, संरक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एअरफोर्समध्ये आता महिला फायटर पायलट होणार परमनंट, संरक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Subscribe

यात महिला पायलट राफेल जेटशिवाय मिग-21, सुखोई-30 आणि मिग-29 ही फायटर जेट उडवणार आहेत.

भारतीय हवाई दलात (Indian Air Force) महिला फायटर पायलटला समावेश करण्याच्या एक्सपेरिमेंट योजनेला आता परमनंट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केले आहे. संरक्षण मंत्रालयाने भारतीय वायुसेनेतील महिला फायटर पायलटला कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ट्विट संरक्षण मंत्र्यांनी केले आहे. राजनाथ सिंह म्हणाले की, भारताच्या नारी शक्तीची क्षमता आणि महिला सक्षमीकरणासाठी आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे .

सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल डिफेंस अकॅडमीने तिन्ही संरक्षण दलात महिलांना प्रवेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. काही महिन्यांनंतर आता संरक्षण मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 2018 मध्ये इंडियन एअर फोर्सच्या फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी यांनी एकट्याने फायटर प्लेन उडवून इतिहास रचला आहे. अशाप्रकारचे धाडस करण्यात यश मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या.

- Advertisement -

2019 मध्ये भारतीय लष्कराने एक महत्त्वाचा निर्णय घेत महिलांना लष्करी पोलिसात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्याच वेळी, 2016 मध्ये इंडियन एअरफोर्सने फायटर स्ट्रीममध्ये महिलांना सामील करुन घेण्यासाठी एक्सपेरिमेंट योजनेा सुरु केली. यावेळी 16 महिलांना फायटर पायलट म्हणून नियुक्त करण्यात आले.

भारतीय एअर फोर्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, संरक्षण मंत्रालयाने महिलांना फायटर पायलटला कायस्वरुपी नियुक्त करण्याच्या योजनेस मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे महिलांच्या सैन्य भरतीचा मार्ग सुकर झाला आहे. त्याच वेळी, नॅशनल डिफेन्स अकादमी जून 2022 मध्ये महिला कॅडेट्सची पहिली तुकडी समाविष्ट करणार आहे. यात महिला पायलट राफेल जेटशिवाय मिग-21, सुखोई-30 आणि मिग-29 ही फायटर जेट उडवणार आहेत. राफेल पायलट फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आयएएफच्या प्रदर्शनाचा भाग होता. सध्या 9 हजारांहून अधिक महिला भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात सेवा देत आहेत.


Omicron चा धोका कायम, निर्बंध शिथिल करणं पडेल महागात: WHO चा इशारा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -