घरElection 2023छत्तीसगडमधील महिलांना प्रतिवर्ष...; दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी काँग्रेसकडून आर्थिक मदतीचे आश्‍वासन

छत्तीसगडमधील महिलांना प्रतिवर्ष…; दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी काँग्रेसकडून आर्थिक मदतीचे आश्‍वासन

Subscribe

रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहचली आहे. छत्तीसगडमध्ये मतदानाचा एक टप्पा पार पडला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी आज काँग्रेसने राज्‍यातील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यातील महिलांना प्रतिवर्ष 15 हजारु रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. (Women in Chhattisgarh every year Assured financial assistance from Congress CM bhupesh Baghel ahead of second phase polls)

हेही वाचा – Jalna : गावबंदीचे पोस्टर फाडल्याने दोन गटांत तुंबळ हाणामारी; मनोज जरांगेंकडून कारवाईची मागणी

- Advertisement -

भूपेश बघेल म्हणाले की, आज दिवाळीच्या शुभमुहूर्तावर माता लक्ष्मीजींच्या आशीर्वादाने आणि छत्तीसगढ माहातरी यांच्या आशीर्वादाने राज्यातील महिला शक्तीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसचे सरकार स्थापन होताच छत्तीसगड गृह लक्ष्मी योजनेंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यात थेट 15,000 रुपये दिले जातील, असे भूपेश बघेल यांनी आश्वासन दिले आहे. दरम्यान, विवाहित महिलांना प्रतिवर्षी 12 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, अशी ग्‍वाही भाजपाने आपल्‍यान निवडणूक जाहीरनाम्यात दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, छत्तीसगडमध्‍ये विधानसभेच्‍या 90 जागांपैकी 20 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबरला पार पडले. उर्वरित 70 जागांसाठी म्हणजेच दुसऱ्या टप्प्यातील मतदान 17 नोव्हेंबरला होणार आहे. 70 जागांसाठी या निवडणुकीत 953 उमेदवार रिंगणात आहेत.

हेही वाचा – शरद पवारांनी घेतलं ओबीसी प्रमाणपत्र? कथित जातीचा दाखला सोशल मीडियावर व्हायरल, काय आहे प्रकरण…

पहिल्या टप्प्यात काँग्रेसचा सफाया : अमित शहा

काही दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या जशपूरमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात भाजपा सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. निवडणूक रॅलीला संबोधित करताना अमित शहा म्हणाले होते की, “छत्तीसगडमधील पहिला टप्पा संपला आहे. मी नुकताच रात्री रायपूरमधील सभेतून परतलो आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेसचा सफाया झाला आहे. येत्या काही दिवसांत छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होणार असल्याची पुष्टी झाली आहे, असेही त्यांनी म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -