घरक्रीडाभारतीय बॉक्सर नीतूची महिलांच्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक

भारतीय बॉक्सर नीतूची महिलांच्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक

Subscribe

निकहत जरीन सलग दुसऱ्यांदा तर हरियाणाची नीतू प्रथमच वर्ल्ड चॅम्पियन होण्यापासून केवळ एक पाऊल दूर अंतरावर आहे.

World Boxing Championships News : निकहत जरीन सलग दुसऱ्यांदा तर हरियाणाची नीतू प्रथमच वर्ल्ड चॅम्पियन होण्यापासून केवळ एक पाऊल दूर अंतरावर आहे. निकहतने ऑलिम्पिक पदक विजेती आणि मागच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील रौप्य विजेती कोलंबियाच्या व्हिक्टोरिया व्हॅलेन्सिया इंग्रिटचा 5-0 असा पराभव केला, तर नीतूने आशियाई चॅम्पियन आणि मागच्या जागतिक विजेतेपद रौप्यविजेत्या कझाकिस्तानच्या अलुआ बाल्किबेकोवाचा 5-2 असा पराभव केला. नीतूने गेल्या वर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अलुआकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे.

निकहतसाठी ही चॅम्पियनशिप खास बनली आहे. कारण तिची आई पहिल्यांदाच तिला चॅम्पियनशिपमध्ये खेळताना पाहण्यासाठी आली होती. निकहतने सांगितले की, पूर्वी तिची आई रिंगमध्ये येण्याच्या केवळ विचाराने अस्वस्थ व्हायची, पण गेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदक मिळवल्यानंतर ती थोडीशी मजबूत झाली आहे. त्यामुळेच तिला खेळताना पाहण्यासाठी तिची आई या चॅम्पियनशिपमध्ये आली आहे. मार लागल्यावर आई थोडी अस्वस्थ होते, पण आता तिला समजले आहे. तिला इथे सुवर्ण जिंकायचे आहे आणि पुन्हा एकदा आईच्या गळ्यात ते घालायचे आहे, हे आईला समजलं आहे, असं देखील निकहतने सांगितलं आहे.

- Advertisement -

या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वश्रेष्ठ बाउट होती, असं देखील निखतने सांगितंय. तिने २०१९ मध्ये बिग बाउटमध्ये इंग्रिटचा पराभव केला आहे. चार वर्षांपूर्वी तिने इंग्रिटविरोधात रणनीती अवलंबली होती जी पुन्हा एकदा कामी आली. या चॅम्पियनशिपमध्ये तिच्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा मोठा वाटा आहे. निखत अंतिम फेरीत आशियाई चॅम्पियन न्योन थी टॅमशी खेळणार आहे.

उपांत्य फेरीत प्रवेश करण्यापूर्वी नीतूच्या मनात गेल्या वर्षी इस्तंबूल (तुर्की) येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीबद्दल सतत डोक्यात विचार सुरू होता. ती तापाने त्रस्त असूनही कझाकस्तानच्या अलुआ बाल्किबेकोवाकडून लढली आणि अगदी जवळच्या सामन्यात हरली होती, अन्यथा, त्याच क्षणी जागतिक अजिंक्यपद पदक तिच्या हातात आलं असतं, असं देखील नितू म्हणाली. त्या काळात नीतूलाही प्रशिक्षकांनी खेळण्यास मनाई केली होती, पण ती खेळली आणि विजयाच्या उंबरठ्यावर गेली. नीतू या स्पर्धेत मोठ्या निर्धाराने आली होती, तिला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचाच, असा इरादाच तिने पक्का केला होता. प्रशिक्षकांच्या रणनीतीनुसार, बाल्किबेकोवापासून दूर राहून खेळायचं नाही. असं तिने ठरवलं होतं. आपल्याजवळ जाऊन येऊन हल्ला करतील याचा धोका असतो. त्यात बाल्कीबेकोवा दूरवरून खेळण्यात पटाईत असल्याचे नीतू सांगते. ती दुरूनही खेळते, पण आज तिने तसं केलं नाही, याचा तिला फायदा झाला असल्याचं देखील नीतू म्हणाली.

- Advertisement -

पहिली फेरी २-३ ने गमावल्यानंतर नीतूने दुसऱ्या फेरीत जोरदार पुनरागमन करत ४-१ असा विजय मिळवला. तिसऱ्या फेरीतही ती अलुआच्या जवळ गेली आणि तिच्यावर हल्ला करत राहिली. ती देखील रिंगमध्ये पाच वेळा पडली, परंतु अलुआविरुद्धच्या तिच्या मागील पराभवाचा बदला तिने घेतला. नीतूची अंतिम फेरीत मंगोलियाच्या लुत्साईखानशी लढत होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -