Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश पाकिस्तानच्या राष्ट्रपती भवनात महिला कार्यकर्तीचा विनयभंग!

पाकिस्तानच्या राष्ट्रपती भवनात महिला कार्यकर्तीचा विनयभंग!

Related Story

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानचे माजी गृहमंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे ज्येष्ठ नेते रेहमान मलिक यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप सिंथिया डी रिची नावाच्या अमेरिकन महिलेने केला होता. त्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठा गदारोळ झाला होता. आता पुन्हा एकदा तसाच एक आरोप एका महिला सामाजिक कार्यकर्तीने केला असून यामध्ये थेट पाकिस्तानच्या राष्ट्रपती भवनाचं नाव घेण्यात आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानमधल्या राष्ट्रपती भवनासारख्या अतिसुरक्षित ठिकाणी देखील महिला सुरक्षित नसल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सदर महिलेने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.

पाकिस्तानी महिला कार्यकर्त्या मारिया इकबाल तराना या एका कार्यक्रमासाठी पाकिस्तानच्या राष्ट्रपती भवनात गेल्या होत्या. तेव्हा तिथल्या अधिकाऱ्याने आपला विनयभंग केल्याचा दावा तराना यांनी एका ट्वीटमध्ये केला आहे. ‘अफाक अहमद असं या अधिकाऱ्याचं नाव असून मी राष्ट्रपती भवनात गेल्यानंतर या अधिकाऱ्याने मला शरीरसंबंध ठेवण्यासाठी मागणी केली होती. मात्र, मी नकार दिल्यानंतर त्याने मला तिथून हाकलून दिलं’, असं मारिया इकबाल तराना यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मारिया इकबाल या पाकिस्तानमध्ये शिक्षण क्षेत्राशी संबंधित सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी यासाठी एक सामाजिक संस्था देखील सुरू केली आहे. त्यासोबतच त्या पाकिस्तानमध्ये महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी काम करत असल्याचं पाकिस्तानमधल्या स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -