Eco friendly bappa Competition
घर क्रीडा कुस्तीपटूंनी पदके विसर्जीत करण्याचा निर्णय घेतला मागे, शेतकरी नेत्यांनी काढली समजूत

कुस्तीपटूंनी पदके विसर्जीत करण्याचा निर्णय घेतला मागे, शेतकरी नेत्यांनी काढली समजूत

Subscribe

आंदोलक कुस्तीपटू यांनी त्यांनी कमावलेलं मेडल गंगेमध्ये विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय आता त्यांनी मागे घेतला आहे. त्यामुळे या दिवसासाठीच या कुस्तीपटू महिलांनी दिवस-रात्र एक करून हे पदके कमवून देशाचे नाव उंचावर नेले का? असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संसदेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन केले. त्याचवेळी दिल्लीमध्ये धरणे आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटू मुली आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पैलवानांनी बॅरिकेड्स तोडून नवीन संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी कुस्तीमध्ये भारताला मेडल पटकावून देणाऱ्या कुस्तीपटू विनेश फोगाट, संगीता फोगाट, साक्षी मलिक, पैलवान बजरंग पुनिया यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतले. यानंतर आता कुस्तीपटुंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानुसार, आंदोलक कुस्तीपटू यांनी रक्ताचं पाणी करुन कमावलेलं मेडल गंगेमध्ये विसर्जीत करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय आता मागे घेण्यात आलेला आहे. त्यामुळे या दिवसासाठीच कुस्तीपटू महिलांनी दिवस-रात्र एक करून हे पदके कमवून देशाचे नाव जगात उंचावले होते का? असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -