घरदेश-विदेशनितीश कुमारांच्या 'त्या' वक्तव्यानंतर महिला आयोग Action मोडवर; विधानसभा अध्यक्षांना नोटीस

नितीश कुमारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर महिला आयोग Action मोडवर; विधानसभा अध्यक्षांना नोटीस

Subscribe

बिहारमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांबाबत केलेले वक्तव्य हे त्याचे कारण आहे.

नवी दिल्ली : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांच्या ‘डर्टी टॉक’ वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या माफीनंतरही हा गोंधळ थांबलेला नाही. आता याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने विधानसभा अध्यक्षांना नोटीस पाठवली आहे. आयोगाने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. (Womens Commission on Action Mode after Nitish Kumars That Statement Notice to Speaker of Legislative Assembly)

बिहारमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांबाबत केलेले वक्तव्य हे त्याचे कारण आहे. नितीश कुमारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर भाजपसह विरोधकांनी त्यांना चोहूबाजुने घेरले आहे. अशातच आता राष्ट्रीय महिला आयोगाने बिहार विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अपमानास्पद टिप्पणीबद्दल कारवाई करावी आणि विधानसभेच्या रेकॉर्डमधून त्यांची टिप्पणी काढून टाकण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Anandacha Shidha : सुषमा अंधारेंनी 30-40 ग्रॅमचा मागितला हिशोब; कंत्राटदाराच्या चौकशीची मागणी

- Advertisement -

काय आहे त्या पत्रात?

राष्ट्रीय महिला आयोगाने बिहारच्या विधानसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, NCW ला राष्ट्रीय महिला आयोग कायदा, 1990 च्या कलम 10 अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना महिलांच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्याशी संबंधित प्रकरणांवर देखरेख आणि तपासणी करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. ज्यामध्ये महिलांना संरक्षण देण्यासाठी आणि समानता आणि विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बनवलेल्या कायद्यांतर्गत अधिकार्‍यांकडे हे प्रकरण उचलण्याचाही उल्लेख आहे. जात जनगणना अहवाल सादर करताना बिहार विधानसभेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या अशोभनीय वक्तव्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाला इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मिळाली आहे. महिलांबद्दल अत्यंत अनादर दाखवणाऱ्या जबाबदार पदांवर असलेल्या व्यक्तींनी केलेल्या अशा अपमानास्पद, अश्लील विधानांचा आयोग तीव्र निषेध करत असल्याचे त्या पत्रात नमूद आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन महिला आयोगाने मुख्यमंत्र्यांवर कडक कारवाई करावी, असे आवाहन केले.

हेही वाचा : वर्ष उलटले तरीही भाव वाढीची प्रतीक्षा; शेतकऱ्यांचं पांढरं सोनं घरातच पडून, दिवाळी अंधारात…

विधानसभेत नितीश कुमार यांनी मागितली माफी

मंगळवारी केलेल्या वक्तव्यानंतर जेव्हा बुधवारी (8 नोव्हेंबर) नितीश कुमार सभागृहात पोहोचले तेव्हा विरोधी पक्षनेत्यांनी गोंधळ घातला आणि घोषणाबाजी सुरू केली. भाजप नेत्यांनी नितीश कुमार, लाज बाळगा, लाज बाळगा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. हे पाहून नितीश कुमार म्हणाले, मला स्वतःची लाज वाटते, जर कोणाला माझे शब्द चुकीचे वाटले असतील तर मी त्याबद्दल माफी मागतो आणि माझे वक्तव्य मागे घेतो. मी त्या माझ्या वक्तव्याविषयी दु:ख व्यक्त करतो अशा शब्दांत त्यांनी माफी मागितली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -