घर देश-विदेश जागतिक बँकेच्या अहवालात भारताचे कौतुक; म्हणाले...

जागतिक बँकेच्या अहवालात भारताचे कौतुक; म्हणाले…

Subscribe

नवी दिल्ली : जागतिक बँकेने त्यांच्या अहवालात भारताचे कौतुक केले आहे. भारतात दोन दिवसीय G20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापूर्वीच जागतिक बँकेने भारताचे कौतुक केले आहे. G20 या शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे आज सायंकाळी ते भारतात पोहचणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ते दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

जागतिक बँकेने अहवालात म्हटले की, “अवघ्या 6 वर्षांतच भारताने आर्थिक वेगाने लक्ष गाठले आहे. जर भारताने हेच लक्ष समान्य गतीने चालले असेत. तर त्यांना लक्ष गाठण्यासाठी 47 वर्ष लागली असती आणि भारताचे हे यश डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या बळावर मिळविले आहे. भारताच्या आर्थिक ममावेशाचा दर 2008 मधील 25 टक्क्यांवरून वाढून 6 वर्षांत प्रौढांसाठी 80 टक्क्यांहून अधिक झाला आहे.”

- Advertisement -

 

हेही वाचा – Sanatan Dharma : मोदी अन् त्यांचे सहयोगी…; सनातन धर्माचा उल्लेख करत उदयनिधींचा हल्लाबोल

देशाच्या विकासचा वेग – पीएम मोदी

- Advertisement -

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि आमच्या देशाची इच्छाशक्तीची प्रशंसा केली आहे. देशाचा हा वेग नवनिर्मामाणाचे प्रमाण आणि विकासचा आहे.” 2022-23 या आर्थिक वर्षासाठी यूपीआय व्यवहाराचे एकूण मूल्य भारताच्या नॉमिनल GDPच्या सुमारे 50 टक्के होते. यूपीआयच्या माध्यमाने फक्त मे 2023 मध्ये अंदाजे 14. 89 ट्रिलियन रुपयांचा अर्थान 9.41 अब्जांचा व्यवहार केला आहे.

- Advertisment -