घरCORONA UPDATECoronavirus: जागतिक बँक भारताला कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देणार १ अब्ज डॉलर्स

Coronavirus: जागतिक बँक भारताला कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देणार १ अब्ज डॉलर्स

Subscribe

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँक अर्थसहाय्य करणार आहे. जागतिक बँकेच्या पहिल्या मदत योजनेत १.९ अब्ज डॉलर्सची तरतुद करण्यात आली आहे.

भारतात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. दरम्यान, जागतिक बँकेने भारताला आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागतिक बँकेने भारताला १ अब्ज डॉलर्सच्या आपत्कालीन निधीस मान्यता दिली आहे. जागतिक बँकेने म्हटले आहे की, जागतिक बँकेच्या पहिल्या मदत योजनेत १.९ अब्ज डॉलर्सची तरतुद असून २५ देशांना मदत करणार आहे. आपत्कालीन आर्थिक मदतीचा सर्वाधिक वाटा १ अब्ज डॉलर्स भारताला देण्यात आला आहे.


हेही वाचा – राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने मागे घ्या

- Advertisement -

जागतिक बँकेने म्हटले आहे की, “भारताला १ अब्ज डॉलर्सचा आपत्कालीन वित्तपुरवठ्यामुळे अधिक चांगली स्क्रीनिंग, संपर्क ट्रेसिंग आणि प्रयोगशाळांना वापरता येईल.” वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे देखील खरेदी करता येतील. दक्षिण आशियात जागतिक बँकेने पाकिस्तानसाठी २० करोड डॉलर्स आणि अफगाणिस्तानासाठी १० करोड डॉलर्स मंजूर केले आहेत.

दरम्यान, भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. देशात कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये वेग आला आहे, ही चिंताजनक समस्या आहे. जॉन हॉपकिन्सच्या आकडेवारीनूसार देशातील कोरोना विषाणूच्या रुग्णांचा आकडा २५००च्या वर गेला आहे, तर आतापर्यंत ७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूमुळे जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १० लाख १४ हजार ६७३ वर गेला आहे. तर कोरोना विषाणूमुळे ५२ हजार ९७३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -