घरताज्या घडामोडीWorld Cancer Day 2021: जाणून घ्या का साजरा केला जातो 'जागतिक कॅन्सर...

World Cancer Day 2021: जाणून घ्या का साजरा केला जातो ‘जागतिक कॅन्सर दिवस’

Subscribe

कॅन्सर झालेल्या रुग्णांकडे समाजात एका दृष्टिकोनातून पाहिले जाते. कॅन्सर पिडित रुग्णांना वेगळी वागणूक देण्यात येते. लोकांच्या मनातील समज गैरसमज दूर करुन अशा रुग्णांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलता यावा यासाठी कॅन्सर दिवस जगभरात साजरा करण्यात येतो.

सध्या धावपळीच्या जगात आजारांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कॅन्सर सारखे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. देशात ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कॅन्सर दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. १९९३ पासून कॅन्सर दिवस साजरा केला जात आहे. लोकांना कॅन्सर या आजाराची माहिती देणे त्यांच्यात जनजागृती करणे हा उद्देश कॅन्सर दिवस साजरा करण्यामागे आहे. सामान्य माणसाला कॅन्सर या आजाराची लक्षणे आणि वाढता प्रसार रोखण्यासाठी काय करायला हवे याची माहिती देता यावी. कॅन्सर झालेल्या रुग्णांकडे समाजात एका दृष्टिकोनातून पाहिले जाते. कॅन्सर पिडित रुग्णांना वेगळी वागणूक देण्यात येते. लोकांच्या मनातील समज गैरसमज दूर करुन अशा रुग्णांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलता यावा यासाठी कॅन्सर दिवस जगभरात साजरा करण्यात येतो.

१९९३ पासून साजरा केला जाणाऱ्या कॅन्सर दिवसाला दरवर्षी एक वेगळी थीम ठेवण्यात येते. २०१९ ते २०२१ पर्यंत ‘मी आहे आणि मी राहिन’ ही थीम ठेवण्यात आली आहे. पहिला जागतिक कॅन्सर दिवस १९९३ मध्ये युनियन ऑर इंटरनॅशल कॅन्सर कंट्रोल यांच्या वतीने स्विझर्लंडमध्ये साजरा केला गेला होता. कॅन्सर हा कोणताही सामान्य आजार नाही. बरेच लोक या कॅन्सरच्या आजाराशी झुंज देत आहेत. काही या लढ्यात हार मानतात. कॅन्सरमुळे लोक त्यांचा जीव गमावतात. वेगवेगळ्या प्रकारे कॅन्सरचे निदान होते. ब्रेस्ट कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, ब्लड कॅन्सर, गर्भाशयातील कॅन्सर त्याचबरोबर लिव्हर, बोर्न कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर असे कॅन्सरचे विविध प्रकार आहेत. या आजारांवरचे उपचारही खूप महागडे असतात.

- Advertisement -

कॅन्सरवर उपचारांसाठी बऱ्याचदा लोक परदेशात जातात. बऱ्याच दिवसांच्या उपचारानंतर कॅन्सरमधून रुग्णांची मुक्ताता होते. कॅन्सर हा असा आजार आहे जो शरिरीक त्याचबरोबर मानसिकरित्याही रुग्णावर आघात करत असतो. त्यामुळे या काळात रुग्णाचे मानसिक संतुलन चांगले असणे महत्त्वाचे असते. गेल्या काही महिन्यांपासून अनेक सेलिब्रेटीही कॅन्सरची शिकार झाले आहेत. अनेकांचा यात मृत्यूही झाला. कॅन्सरसारख्या आजावर औषधोपचार करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था मदत करत असतात. अनेक ट्रस्टमधून रुग्णांना मोठी मदत केली जाते. अनेक रुग्णालये आहेत तिथे कॅन्सरवर कमी दरात उपचार दिले जातात.


हेही वाचा – जागतिक कर्करोग दिन

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -