घरताज्या घडामोडीOmicron Variant: ...नाहीतर पुन्हा जग महामारीच्या दिशेने जाईल; बिल गेट्स यांचा इशारा

Omicron Variant: …नाहीतर पुन्हा जग महामारीच्या दिशेने जाईल; बिल गेट्स यांचा इशारा

Subscribe

कोरोना नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा प्रसार देशभरात झाला आहे. ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये झपाट्याने ओमिक्रॉनचा प्रसार होत आहे. या दोन्ही देशांमध्ये ओमिक्रॉनमुळे रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. भारतातील आता ओमिक्रॉनबाधित एकूण संख्या २१३वर पोहोचली आहे. ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी चिंता जाहीर केली आहे. बिल गेट्स म्हणाले की, जग महामारीच्या सर्वात वाईट टप्प्यात प्रवेश करू शकते कारण या व्हेरिएंटमुळे जगातील आतापर्यंतची सर्वात वाईट रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते.

बिल गेट्स यांनी ट्वीट करून सांगितले की, त्यांनी जास्त करून सुट्टीचे प्लॅन रद्द केले आहेत. कारण त्यांच्या अनेक मित्रांना नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. ओमिक्रॉन इतर व्हायरसच्या तुलनेत जास्त वेगाने पसरतोय. सर्व देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळताना दिसतील.

- Advertisement -

तसेच बिल गेट्स यांनी दावा केला की, ‘हा व्हेरिएंट डेल्टाच्या तुलनेत कमी गंभीर आहे. परंतु या व्हेरिएंटचे रुग्ण जास्त वेगाने आढळत आहेत. त्यामुळे लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस, बूस्टर डोस घ्यावा. कारण व्हेरिएंटपासून हे सर्वात चांगले संरक्षण देते. तसेच यादरम्यान आपण एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. खासकरून जे जास्त कमकुवत आहेत आणि संवेदनशील आहे, त्यांची काळजी आहे. मग ते रस्त्यावर किंवा इतर देशातील राहणारे असो. त्यामुळे मास्क घाला, मोठ्या कार्यक्रमांना जाणे टाळा आणि लस घ्या. बूस्टर डोस घेतल्याने जास्त सुरक्षा मिळते.’

- Advertisement -

बिल गेट्स पुढे म्हणाले की, ‘एक चांगली बातमी आहे. ओमिक्रॉन इतक्या वेगाने वाढतो की, एकदा जर कोणत्या देशात कहर करतो तर तिथली लाट ३ महिन्यापेक्षा कमी वेळेसाठी असते आणि त्यानंतर काही महिन्यात प्रादुर्भाव कमी होऊ लागतो. तरी देखील जर आपण योग्य पाऊले उचलली तर २०२२मध्ये महामारी संपुष्टात येऊ शकते.’


हेही वाचा – Omicron Variant: देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांची वेगाने वाढ; पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या अधिकाऱ्यांसोबत बैठक


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -