घरदेश-विदेशऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या घरावर ईडीचा छापा! भारताच्या पराभवानंतर महुआ मोईत्रा यांनी भाजपाला डिवचलं

ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या घरावर ईडीचा छापा! भारताच्या पराभवानंतर महुआ मोईत्रा यांनी भाजपाला डिवचलं

Subscribe

World Cup Final : ‘वर्ल्ड कप 2023’चा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. या पराभवानंतर कोट्यावधी भारतीयांमध्ये नाराजी दिसून येत आहे. किक्रेट चाहत्यांची निराशा झाली. भारताच्या पराभवादरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी खिल्ली उडवली आहे. त्या म्हणाल्या की, “ईडीने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या घरावर छापा” टाकला आहे.

- Advertisement -

संसदेत पैशाच्या बदल्यात प्रश्न विचारल्याच्या आरोपांनी घेरलेल्या तृणमूलच्या खासदाराने टीम इंडियाच्या पराभवानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिले, “ब्रेकिंग न्यूज, ईडीचा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या घरावर छापा.” आणखी एक टोमणा मारत त्यांनी त्याच पोस्टमध्ये लिहिले की, अहमदाबाद स्टेडियमचे नाव बदलेल- जवाहरलाल नेहरू क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या विश्चचषकाच्या फायनलमध्ये भारत हरला. असं त्यानी त्या पोस्टमध्ये लिहिले आहे. भारताच्या पराभवानंतर महुआ मोईत्रा शिवाय अनेक युजर्सनी देखील राजकीय पोस्ट टाकून भारताला टोला लगावला आहे.

दरम्यान बसपाचे खासदार दानिश अली म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टेडियममध्ये येण्याची अगोरद घोषणा केली नसावी आणि अशा मोठ्या कार्यक्रमांपासून दूर राहायला हवे होत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पोस्टमध्ये दानिश अलीने लिहीलं आहे की, आम्हीही विजयाच्या जवळ होतो, परंतु आमच्या खेळाडूंनी मानसिक दबावामुळे ते गमावले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही स्टेडियमवर येण्याची घोषण करायला नको होती. अशा प्रसंगांपासून दूर राहून टीव्हीवर खेळाडू शास्त्रज्ञांची कामगिरी पाहणे देशाच्या हिताचे आहे.

- Advertisement -

याआधी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील असाच दावा केला होती की, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राजकीय कार्यक्रम आयोजित करायचा होता म्हणून अंतिम सामना मुंबईहून गुरजातमधील अहमदाबादला हलवण्यात आला. मुंबईला देशातील क्रिकेटचे पारंपारिक केंद्र म्हटले जायचे.

संजय राऊत म्हणाले की, आमचा क्रिकेट संघ खुप यशस्वी आणि आशादायक संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 10 सामने चांगले खेळलो, पण नेरंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम फेरीत आम्ही हरलो. लोक म्हणतात की फायनल वानखेडे स्टेडियमवर झाली असती तर आम्ही जिंकलो असतो. सरदार वल्लभभाई स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले कारण तिथे वर्ल्ड कप जिंकलो असतो तर पंतप्रधान असा संदेश जाईल. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये नरेंद्र मोदी होते आणि त्यामुळे विश्वचषक जिकंला. पडद्यामागे भाजपचा मोठा गेम प्लॅन होता असं राऊत म्हणाले.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताचा डाव 50 षटकात 240 धावांवर कोसळला. कर्णधार रोहित शर्मा (31 चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांसह 47), विराट कोहली (63 चेंडूत चार चौकारांसह 54) आणि केएल राहुल (107 चेंडूत 1 चौकारासह 66) यांनी महत्त्वपूर्ण धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने २४१ धावा करत सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. सामना गमावल्यानंतर कर्णधार रोहित शर्मासह संपूर्ण संघ भावूक दिसत होता. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. सामन्यादरम्यान 1.25 लाख लोक उपस्थित होते. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स हेही सामना पाहण्यासाठी आणि त्यांच्या संघाचा जयजयकार करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -