घरदेश-विदेशICC Cricket World Cup 2023 : सोनिया गांधी यांनी अंतिम सामन्यासाठी टीम...

ICC Cricket World Cup 2023 : सोनिया गांधी यांनी अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा

Subscribe

आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या (ICC Cricket World Cup 2023)अंतिम सामन्यात रविवारी (ता.19 नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (Narendra Modi Stadium Ahemdabad) दुपारी 2 वाजता अंतिम सामना सुरू होईल. भारतीय संघाच्या विजयासाठी देशभरातील क्रिकेट चाहते वेगवेगळ्या प्रकारे प्रार्थना करत आहेत, अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनीही भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आणि खेळाने नेहमीच लिंग, प्रदेश, भाषा, धर्म आणि वर्गाच्या पलीकडे देशाला जोडले आहे.

- Advertisement -

सोनिया गांधी यांनी एका व्हिडीओ संदेशात म्हटले आहे की, “प्रिय टीम इंडिया, या विश्वचषकादरम्यान तुमच्या अतुलनीय कामगिरीबद्दल आणि उत्कृष्ट टीमवर्कसाठी मी तुमचे अभिनंदन करते. तुम्ही देशाला सतत गौरव मिळूवून दिला आणि आम्हाला सामूहिक आनंद आणि अभिमान बाळगण्याचे कारण दिले आहे.”

- Advertisement -

 

सोनिया गांधी म्हणाल्या की,“आणि आता जेव्हा तुम्ही या वर्षी अंतिम सामन्यात भाग घेण्यासाठी तयार आहात, तेव्हा संपूर्ण देश तुम्हाला पाठिंबा देत आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देते. वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी जे काही लागते ते तुमच्याकडे आहे. टीम इंडिलाय खूप खूप शुभेच्छा. जय हिंद”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -