घरक्रीडाआज भारत V/S इंडियाचा सामना

आज भारत V/S इंडियाचा सामना

Subscribe

टीम इंडियाच्या वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यावर सार्‍या देशाचे लक्ष लागून राहिले असल्याने सिनेरसिकांचा लाडका सलमान खानच्या भारत सिनेमाला टीम इंडियाची मॅचची कडवी झुंज द्यावी लागणार आहे.

मुंबईसह देशभरात बुधवारी सर्वत्र रमजान ईद साजरी केली जाणार असून ही ईद संपूर्ण भारतवासियांसाठी लक्षवेधी ठरणार आहे. ईदच्या निमित्ताने इंडिया आणि भारत असा सामना रंगणार असून या दोघांपैकी ईदी नेमकी कोणाला मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. टीम इंडियाच्या वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यावर सार्‍या देशाचे लक्ष लागून राहिले असल्याने सिनेरसिकांचा लाडका सलमान खानच्या भारत सिनेमाला टीम इंडियाची मॅचची कडवी झुंज द्यावी लागणार आहे. टीम इंडिया विराट कोहलीच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरणार असून पहिलाच सामना दक्षिण आफ्रिकेला नमविण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे भाईजान सलमान खान आपल्या प्रेक्षकांसाठी भारत हा सिनेमा घेऊन येणार असून किती कोटींच्या घरात कमाई होते याकडे ही उभ्या भारताचे लक्ष लागून राहणार आहे.

- Advertisement -

दरवर्षी ईदच्या दिवशी सलमान खानकडून हमखास सरप्राईझ त्याच्या चाहत्यांना मिळते. सलमानचे चाहतेही त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात असतात. पण यावर्षी सलमानचा ’भारत’ प्रदर्शना आधीच अनेकदा वादाच्या कचाट्यात सापडला आहे. चित्रपटातील संवाद, चित्रपटाचे नाव यावरून सध्या भाईजानचा हा चित्रपट वादात सापडला आहे. चित्रपटाच्या नावावरून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

View this post on Instagram

Happy campers ???? #TeamIndia

A post shared by Team India (@indiancricketteam) on

- Advertisement -

‘भारत’ हे चित्रपटाचे शीर्षक लोकांच्या भावना दुखावणारे असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.याचिकाकर्त्याने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करून सलमानच्या या चित्रपटाचे टायटल बदलण्याची मागणी केली आहे. सलमानच्या चित्रपटाचे नाव हे बोधचिन्हे व नावे (अनुचित वापर प्रतिबंधक) कायद्याचे उल्लंघन आहे. असे याचिकेत म्हटले आहे. या कायद्यानुसार, ‘भारत’ शब्दाचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करता येत नाही, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.

केवळ चित्रपटाचे नाव नाही तर त्यातील एक डायलॉग गाळण्याची मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे. चित्रपटातील डायलॉगमध्ये सलमान आपल्या नावाची तुलना देशाशी करताना दिसतो. हा संवाद भारतीयांच्या भावना दुखावणारा असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. सलमानच्या चित्रपटावरून वाद होणे हे काही पहिल्यांदा घडलेले नाहीये. या आधी सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाच्या शीर्षकावरूनही वाद झाला होता. या वादावर हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. त्याचबरोबर सलमानची निर्मित ‘लवरात्री’ या चित्रपटालाही असाच विरोध झाला होता. अखेर ऐनवेळी या चित्रपटाचे नाव बदलून ‘लवयात्री’ ठेवण्यात आले होते.

असे असले तरी सलमान खानच्या चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला मिळावा यासाठी चाहते आटापिटा करतात. सलमानचा ’भारत’ या चित्रपटाची चर्चा सगळीकडे आहे. भाईजानच्या एका चाहत्याने तर संपूर्ण थेएटर बुक केले आहे. सलमान दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर सिनेमा घेऊन येतो आणि त्याच्या चित्रपटावर चाहत्यांच्या अक्षरश: उड्या पडतात. गतवर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमानचा ‘ट्युबलाईट’ हा सिनेमा रिलीज झाला होता. पण या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. पण यंदा ‘भारत’कडून सलमानला प्रचंड अपेक्षा आहेत.

मात्र आजूनही चित्रपटाची अडचणी कमी झालेली नाही. कारण आजच ५ जूनला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका विश्वचषक सामना रंगणार आहे. त्यामुळे क्रिकेट विरुद्ध चित्रपट असाच सामना पाहायला मिळणार आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील १५ सामने आयनॉक्स थिएटर्समध्ये दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक सलमानचा ‘भारत’ निवडणार की क्रिकेटचा सामना बघणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘टायगर जिंदा है’ हा कतरिनासोबतचा चित्रपट मात्र चांगलाच गाजला. त्यानंतर पुन्हा एकदा ही जोडी एकत्र आली आहे. सलमान, कतरिनासोबतच यामध्ये सुनील ग्रोव्हर, जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी, दिशा पटानी यांच्याही भूमिका आहेत. विश्वचषक की सलमानचा चित्रपट यापैकी प्रेक्षक काय निवडतील हे ‘भारत’च्या बॉक्स ऑफीस कमाईवरूनच लक्षात येईल.

ईदीसाठी सलमान उत्सुक
ईदच्या दिवशी आपला सिनेमा प्रदर्शित करून पहिल्याच दिवशी कोटींचा गल्ला कमावण्याचे सलमान खानचे लक्ष्य असते. बुधवारी ५ जूनला रमजान ईदच्या निमित्ताने आपला भारत सिनेमा रिलीज करून सलमान ईदीसाठी प्रचंड उत्सुक आहे.

अनुभव पणाला लावा-कोहली
विश्वचषकातील भारताचा पहिला सामना बुधवारी द.आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला. आमच्या संघात बरेच अनुभवी खेळाडू आहेत. या स्पर्धेत चांगली कामगिरी करायची असल्यास हा अनुभव आम्हाला पणाला लावण्याची गरज आहे, जो संघ दडपण चांगल्या पद्धतीने हाताळेल, तोच संघ ही स्पर्धा जिंकेल, तसेच ही स्पर्धा दीर्घकाळ चालणार असल्याने संघामध्ये चांगले वातावरण ठेवण्यावर आमचा भर असेल.

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका
सामन्याची वेळ – दु. ३.०० वाजता
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -