घरCORONA UPDATE'लॉकडाऊनचे निर्बंध हटवल्यास, घातक परिणाम भोगावे लागतील'

‘लॉकडाऊनचे निर्बंध हटवल्यास, घातक परिणाम भोगावे लागतील’

Subscribe

'लॉकडाऊनचे निर्बंध हटवण्याची घाई करु नका,' योग्य उपाययोजना करत लॉकडाऊन सुरु ठेवण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी देशाच्या प्रमुखांना दिला आहे.

‘कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंध उठवल्यास त्याचे घातक परिणाम होतील,’ असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे ‘लॉकडाऊनचे निर्बंध हटवण्याची घाई करु नका, योग्य उपाययोजना करत लॉकडाऊन सुरु ठेवण्याचा सल्ला’ जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी देशाच्या प्रमुखांना दिला आहे.

अन्यथा त्याचे घातक परिणाम होतील

‘लॉकडाऊन हटवावे अशी सगळ्यांसारखी आमची देखील इच्छा आहे. पण, घाईघाईत लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होईल. त्यामुळे योग्य पद्धतीने कोरोनाचा सामना करण्याची गरज आहे अन्यथा त्याचा घातक परिणाम होईल,’ असे वक्तव्य एडहानोम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.

- Advertisement -

दरम्यान, युरोपात कोरोनाचा मोठा फटका बसलेले देश स्पेन आणि इटली लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करत असून लोकांना कामावर जाण्याची परवानगी देत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. स्पेनमध्ये बांधकाम तसेच फॅक्टरी प्रोडक्शन कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर जाण्याची परवानगी देण्याबद्दल विचार केला जात आहे. तर इटलीमध्ये ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. मात्र, काही छोट्या उद्योजक, दुकानांना काम करण्याची परवानगी दिली आहे. परंतु, आपला निर्णय जाहीर करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.


हेही वाचा – LockDown: पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार; फैसला होणार?


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -