घरताज्या घडामोडीCorona Vaccine: गुडन्यूज! या आठवड्यात स्वदेशी लसीला WHO कडून मिळणार मंजूरी

Corona Vaccine: गुडन्यूज! या आठवड्यात स्वदेशी लसीला WHO कडून मिळणार मंजूरी

Subscribe

कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळापासून वैज्ञानिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीवर (Corona Vaccine) काम सुरू केले होते. आता देशात सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute of India) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे उत्पादन करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड (Covishield) लसीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मंजूरी दिली होती. परंतु भारत बायोटेककडून डेटा मिळण्यात विलंब होत असल्याने कोव्हॅक्सिनला (Covaxin) मंजूरी देणे थांबवले होते. पण आता याबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, लवकरच देशातील स्वदेशी लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजूरी मिळणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारत बायोटेककडून मिळलेल्या डेटाचे विश्लेषण केले आहे. त्यामुळे या आठवड्यात कोव्हॅक्सिनला मंजूरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

दरम्यान विरोधक कोव्हॅक्सिनला मंजूरी देण्याबाबत सरकारसमोर प्रश्न उपस्थितीत करत होते. ज्यानंतर आरोग्य मंत्रालय अॅक्शन मोडमध्ये आले आणि सर्व आवश्यक औपचारिकता पूर्ण करून जागतिक आरोग्य संघटनेला डेटा पाठवला होतो.

- Advertisement -

सध्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात वेगाने लसीकरण सुरू आहे. अनेक भारतीयांनी कोव्हॅक्सिनचे दोन डोस घेतले आहेत. परंतु कोव्हॅक्सिन घेतलेल्या लोकांना अनेक देश आपल्या देशात येण्यास परवानगी देत नाही आहेत. कारण जागतिक आरोग्य संघटनेकडून कोव्हॅक्सिन लसीला मंजूरी मिळाली नाही आहे. जर आता कोव्हॅक्सिनला मंजूरी मिळाली तर ही लस घेतलेले लोकं इतर देशात प्रवास करू शकतील.


हेही वाचा – पुण्यात प्रशिक्षणासाठी गेलेल्या नागपूरच्या १२ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -