घरताज्या घडामोडीजगातील सर्वाधिक वायुप्रदूषण एकट्या दिल्लीत, प्रदूषित ५० शहरांमध्ये भारताचा ३५ वा क्रमांक...

जगातील सर्वाधिक वायुप्रदूषण एकट्या दिल्लीत, प्रदूषित ५० शहरांमध्ये भारताचा ३५ वा क्रमांक – रिपोर्ट

Subscribe

UN पर्यावरण संरक्षण संस्थेने जगभरातील शहरातील एअर क्वालिटी रँकिंग जारी केली आहे. या रिपोर्टमध्ये दिल्ली हे शहर जगातील कॅपिटल सिटीमध्ये सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.

New Delhi : भारताची राजधानी असलेली दिल्ली गेली अनेक वर्ष प्रदूषणाच्या विळख्यात आहे. दिल्लीच्या प्रदूषणाबाबत आता जागतिक आरोग्य संघटनेने एक रिपोर्ट जारी केला आहे. UN पर्यावरण संरक्षण संस्थेने जगभरातील शहरातील एअर क्वालिटी रँकिंग जारी केली आहे. या रिपोर्टमध्ये दिल्ली हे शहर जगातील कॅपिटल सिटीमध्ये सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. त्याचप्रमाणे जगातील प्रदूषित ५० शहारांमध्ये भारताचा ३५वा नंबर आहे.

मंगळवारी जारी केलेल्या एअर क्वालिटी रिपोर्टमध्ये म्हटलेय, एअर क्वालिटी रॅकिंगमध्ये भारताची राजधानी दिल्लीत (८५.५) सर्वाधित प्रदूषण आहे. त्यानंतर बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये ७८.१ आणि तिसऱ्या क्रमांकावर आफ्रिका महाद्विपच्या चाड देशाची राजधानी जामेनामध्ये ७७.६ प्रदूषण आहे.

- Advertisement -

२०२१च्या वैश्विक एअर क्वालिटी रिपोर्टनुसार, ११७ देशांच्या ६२७५ शहरातील डेटा गोळा करण्यात आला. या रिपोर्टमध्ये पीएम २.५ प्रदूषणापैकी २० ते ३५ टक्के प्रदूषण हे वाहन प्रदूषण म्हणून नोंदवले गेले आहे.

जगातील प्रदूषित शहरांमध्ये तजाकिस्तानचे दुशांबे शहर चौथ्या क्रमांकावर आहे. तर ओमानचे मस्कट हे शहर पाचव्या क्रमांकावर, नेपाळचे काठमांडू सहाव्या, बहरीनचे मनामा शहर सातव्या क्रमांकावर आहे. तसेच इराकमध्ये बगदाद शहर आठव्या क्रमांकावर, किग्रीस्तानचे बिसकेक नवव्या, उज्बेकिस्तानचे ताशकंद शहर दहाव्या क्रमांकावर आहे आणि पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद ११ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानची राजधानी नवी दिल्ली पेक्षा जास्त स्वच्छ असल्याचे या रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Ukraine-Russian War- पुतिन यांची ‘सिक्रेट गर्लफ्रेंड’ निशाण्यावर, देशाबाहेर हकालपट्टी करण्याची मागणी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -