WHO : कोरोना लस आणि कर्णबधीरपणाचा काय संबंध ? WHO च्या अभ्यासाला सुरूवात

WHO hearing loss

जागतिक आरोग्य संघटना (WHO) मार्फत कर्णबधीरपणा आणि कोरोना लस यामधील परस्पर संबंधांचा अभ्यास करण्यात येत आहे. एकुण ८० टक्के म्हणजे १६४ प्रकरणात हा संबंध आहे का ? हे शोधण्यासाठीचा प्रयत्न डब्ल्यूएचओच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या सर्व लोकांनी फायझर बायोटेकच्या लसीचा डोस घेतला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने मांडलेल्या माहितीनुसार जागतिक पातळीवर लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये काही अंशी लोकांमध्ये कमी एकू येण्याचा दोष आढळून आला आहे. पण ही टक्केवारी खूपच कमी आहे. ज्या व्यक्तींनी फायझऱ बायोटेकचा डोस घेतला आहे, अशा व्यक्तींमध्ये हा दोष आढळला आहे. एकुण ११ अब्ज डोस हे जागतिक पातळीवर वितरीत करण्यात आले होते. आतापर्यंत एकुण ३६७ प्रकरणे अशी आढळली आहेत, ज्या व्यक्तींनी कमी एकू येण्याचा दोष आढळला आहे. या व्यक्तींना एकण्यााच्या बाबतीत अनेक दोष आढळले आहेत.

हा एकण्याचा दोष हा एक किंवा दोन्ही कानांमध्ये आढळलो. टिन्नीटस (Tinnitus) असे या दोषाचे नाव आहे. या दोषामध्ये दिवसातून अनेकदा अचानकपणे एकू न येण्याचा दोष आढळतो. एकू न येणाऱ्या व्यक्तींचे सरासरी असे वयोमान हे ४७ वर्षे आहे. अनेक व्यक्ती निरोगी असून त्यांच्यामध्ये कोणत्याही आरोग्याच्या तक्रारी आधी नव्हत्या. या रूग्णांमध्ये सरासरी वय हे ७५ टक्के इतके आढळले आहे. या रूग्णांमध्ये महिलांची टक्केवारी मोठी आहे. जवळपास ७५ टक्के महिला आढळल्याचे डब्ल्यूएचओच्या अहवालात आढळले आहे. त्यामुळेच अशा व्यक्तींच्या बाबतीत अधिक अभ्यास करण्यचा डब्ल्यूएचओचा मानस आहे. या प्रकरणात अत्यंत कमी डेटा सध्या उपलब्ध आहे. त्यामुळेच या विषयात आणखी तपास सुरू असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली आहे.