घरदेश-विदेशWorld Heart Day: 'या' ८ कारणांमुळे तरुणांपासून वृध्दांमध्ये वाढतेय ह्रदयविकाराची भीती

World Heart Day: ‘या’ ८ कारणांमुळे तरुणांपासून वृध्दांमध्ये वाढतेय ह्रदयविकाराची भीती

Subscribe

दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस जागतिक ह्रदय दिन हा दिवस केला जातो. बदलती जीवनशैली आणि आहारपद्धतीची थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. विशेषत: ह्रदयावर याचा सर्वाधिक परिणाम जाणवतो. त्यामुळे ह्रदयाची काळजी घेणे आणि आपले ह्रदय निरोगी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यात ह्रदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ह्रदय विकारामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. वर्ल्ड फेडरेशच्या माहितीनुसार, दरवर्षी १८. ६ मिलियन लोक ह्रदयसंबंधीत आजारांमुळे आपला जीव गमावतात. हे प्रमाण जागतिक मृत्यूंपैकी ३१ टक्के इतके आहेत. यातील ८५ टक्के मृत्यू हार्ट अटॅक (Cardiovascular complications) आणि स्ट्रोकमुळे होतात. हे ह्रदयरोग टाळण्यासाठी, खाण्या-पिण्याची सवय बदलल्या पाहिजेत. तसेच व्यायामावर भर दिला पाहिजे. आज (२ सप्टेंबर) जागतिक हृदय दिन असल्याने हृदयासंबंधित आजार आणि कारणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.(World Heart Day)

ह्रदयविकाराची प्रमुख कारणे :- 

१) ह्रदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड

शरारीतील ह्रदय हा महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. ज्या माध्यमातून शरीरातील रक्त २४ तास शुद्ध करण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आहारातील जंगफूडमुळे लठ्ठपणा आणि इतर ह्दयासंबंधीत आजार बळावतात. यामुळे रक्तपुरवठा करणाऱ्या यंत्रणांवर ताण पडतो आणि ह्रदयाला सुरळीत रक्तपुरवठा होऊ शकत नाही. अशावेळी ह्रदयासंबंधीत आजार वाढू शकतात.

- Advertisement -

२) ध्रुमपान आणि मद्यपान करण्याची सवय

दिवसातून अनेकदा धुम्रपान करण्याची सवय असल्यास तर ती सवय लवकर बदला. कारण धुम्रपानामुळे ह्रदयसंबंधीत आजार होण्याचा सर्वाधिक धोका आहे. कारण सिगारेटमधील तंबाखू ह्रदय आणि रक्ताला मोठ्याप्रमाणात नुकसान पोहचवत असतो. याशिवाय मद्यपानामुळेही ह्रदयाला हानी पोहचवली जाते.

३) अतिताणतणाव

कामाचे अति टेंशन हे देखील हार्ट अटॅक येण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यात डोकं शांत ठेऊन काम करा. अनेक गोष्टींचा विचार घेऊन दिवस सुरु करु नका.

- Advertisement -

४) व्यायामाचा अभाव

धावपळीच्या जीवनशैलीमुळे व्यायाम करण्यास वेळ भेटत नाही, यामुळे शरीरातील सर्व अवयवांची हालचाल सुरळीतरित्या होत नाही. याचा थेट परिणाम ह्रदयावर होतो. कारण प्रत्येक अवयवातील रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाह योग्य प्रमाण सुरु राहत नाही. अशावेळी हार्ट अटॅकचा धोका संभवतो. त्यामुळे दिवसातून किमान १० मिनिटे व्यायामासाठी वेळ द्या.

५) लठ्ठपणा

पिझ्झा, बर्गर, रस्त्यावरील तेलकट तूपकट पदार्थ खाण्याची सवय असेल तर बंद करा. कारण या पदार्थ्यांमुळे आपल्य़ा शरीरात नको असलेल्या चरबी वाढते आणि लठ्ठपणाचे शिकार व्हावे लागते. या लठ्ठपणामुळे अनेकदा श्वास घेण्यास, चालण्यास त्रास होतो.

६) अयोग्य जीवनशैली

धावपळीच्या जगात आहार, व्यायाम आणि इतर शरीरासाठी आवश्यक गोष्टींसाठी वेळ मिळत नाही. याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अनेकदा कामाच्या वाढत्या ताणामुळे आपण वेळेवर जेवत नाही. रात्री वेळेवर झोपत नाही, किंवा कामाच्या प्रेशरमुळे झोप लागत नाही. अशा गोष्टी सतत होत राहिल्यास ह्रदयविकारासंबंधीत आजारपण वाढू शकते.

 ह्रदयरोग टाळण्यासाठी काय करावे आणि काय करु नये 

७) नियमित आरोग्य तपासणी करा

३० वर्षानंतर रक्तदाबाची नियमितपणे तपासणी करणे गरजेचे आहे. विशेषत: लठ्ठपणाग्रस्त रुग्णांनी किमान आपले वजन, रक्तदाब चेक करत राहावे.

८) ‘या’ गोष्टी खाणं टाळा

हृदयरोग टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे. अधिक तळलेले अन्न, तूप, लोणी, मीठ, तिखट, मिरपूड आणि मिठाई हे कोलेस्ट्रॉल आणि चरबीयुक्त पदार्थ खाणं टाळंल पाहिजे.

९) ‘ही’ लक्षणे असल्यास काळजी घ्या

छातीत डाव्या किंवा उजव्या बाजूला अनेकदा दुखत असेल तर ही हृदयरोगाच्या प्रारंभाची लक्षणे आहेत. किंवा घशामध्ये कोंडल्यासारखे वाटणेही हे देखील हृदयरोगाशी संबंधित लक्षण आहे.

१०) फिट राहण्यासाठी ‘या’ गोष्टी टाळाचं

गरजेपेक्षा जास्त जंक फूड किंवा इतपर पदार्थ खावू नका. कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका. हिरव्या भाज्या आणि फळे खा. तंबाखू आणि धूम्रपान, दारू पिण्याची सवय कमी करा, निरोगी हृदयासाठी ‘हे’ अवश्य करा. दररोज 30 मिनिटे व्यायाम करा. तुमचे वजन, रक्तदाब, रक्तशर्करा तपासून घ्या. अशा प्रकारे तुम्ही तुमचे ह्रदय फिट ठेवू शकता.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -