घरताज्या घडामोडीजगातल्या सर्वात मोठ्या स्टेडिअमला नरेंद्र मोदींचे नाव

जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडिअमला नरेंद्र मोदींचे नाव

Subscribe

अहमदाबाद येथील सरदार पटेल क्रिकेट स्टेडिअमचे नरेंद्र मोदी स्टेडिअम म्हणून आज बुधवारी नामकरण करण्यात आले. जगभरातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम म्हणून या स्टेडिअमची ओळख आहे. तब्बल १ लाख १० जणार प्रेक्षकांच्या क्षमतेचे हे स्टेडिअम आहे. भारत विरूद्ध इंग्लंड पिंक बॉल कसोटी सामन्याला आज बुधवारपासून याठिकाणी सुरूवात होत आहे. भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या उपस्थितीत या स्टेडिअमचे भूमीपूजन करण्यात आले. पिंक बॉल टेस्टआधी राष्ट्रपतींनी या स्टेडिअमचे लोकार्पण झाल्याचे जाहीर केले. भारतातील सर्वात मोठ्या स्टेडिअमच्या उद्घाटनाला देशाचे गृह मंत्री अमित शहा, बीसीसीआय सेक्रेटरी जय शहा, क्रीडा मंत्री किरेन रज्जू आदींचीही उपस्थिती होती.

भारतात मोटेरा स्टेडिअममध्ये होणारा पिंक बॉल कसोटी सामना हा दिवस रात्र प्रकारातील दुसरा कसोटी सामना आहे. याआधीचा पिंक बॉल कसोटी सामना हा बांग्लादेश विरोधात कोलकात्याच्या ईडन गार्डन येथे झाला होता. जगभरात ऑस्ट्रेलियातील एमसीजी स्टेडिअम हे आतापर्यंतचे जगभरातील सर्वात मोठे स्टेडिअम होते. याठिकाणची प्रेक्षक क्षमता ९० हजार इतकी होती. तर मोटेरा येथील प्रेक्षक क्षमता १ लाख १० हजार इतकी आहे. जागतिक दर्जाचे असे चार ड्रेसिंग रूम्स या स्टेडिअममध्ये आहेत. कोरोनाचे संकट पाहता आजच्या सामन्यासाठी ५५ हजार इतकी (५० टक्के) प्रेक्षक क्षमतेने हे क्रिकेट स्टेडिअममध्ये अपेक्षित आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली यानेही आज बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, आपल्या देशात सर्वात मोठे स्टेडिअम असणे ही गौरवाची गोष्ट आहे. याठिकाणचे इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय उत्तम असून आम्ही या स्टेडिअमवर खेळण्यासाठी खूपच उत्साही असल्याचे त्याने नमुद केले आहे. क्रिकेट सामन्यात प्रेक्षकांचा पाठिंबा हा खूपच महत्वाचा आहे. त्यामुळेच या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक येतील असे त्याने पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

- Advertisement -

अहमदाबाद स्पोर्ट सिटीचे मोदीजींचे स्वप्न पूर्ण – अमित शहा

नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील तरूणाईचा सैन्यातील आणि क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढावा अशी भावना व्यक्त केली होती. त्यानुसारच मोदीजींनी क्रिकेटसाठीचा पैसा हा विविध खेळांसाठीचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी वापरला. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अहमदाबादला स्पोर्ट सिटी म्हणून ओळख मिळावी असे स्वप्न पाहिले होते. आज सरदार वल्लभभाई स्टेडिअमच्या लोकार्पणाच्या निमित्ताने मोदीजींचे ते स्वप्न पुर्ण झाले असे अमित शहा यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. मोदीजींनी गुजरातमध्ये खेळासाठी जे व्हिजन ठेवले ते आज सत्यात उतरले असेही त्यांनी यावेळी सांगितले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -