Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Russian Diplomat Punch Video: Ukraine चा झेंडा खेचला; रशियन नेत्याला युक्रेनच्या खासदाराने...

Russian Diplomat Punch Video: Ukraine चा झेंडा खेचला; रशियन नेत्याला युक्रेनच्या खासदाराने केली मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Subscribe

युक्रेनचे खासदार ऑलेक्झांडर मारिकोव्स्की एका रशियन प्रतिनिधीला मारहाण करताना दिसत आहेत. तुर्कीची राजधानी अंकारा येथे एका परिषदेदरम्यान दोन्ही देशांचे प्रतिनिधी भेटले तेव्हा ही घटना घडली.

रशिया आणि युक्रेनमध्ये तणाव वाढत आहे. त्याचा परिणाम आता दोन्ही देशातील राजकारण्यांवरही स्पष्टपणे दिसून येत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, युक्रेनचे खासदार ऑलेक्झांडर मारिकोव्स्की एका रशियन प्रतिनिधीला मारहाण करताना दिसत आहेत. तुर्कीची राजधानी अंकारा येथे एका परिषदेदरम्यान दोन्ही देशांचे प्रतिनिधी भेटले तेव्हा ही घटना घडली. ( World News Ukraine Mp Punches russian Diplomat in face after toring ukraine flag during turkey summit )

अंकारा येथे आयोजित ब्लॅक सी इकॉनॉमिक कोऑपरेशन (पीएबीएसईसी) च्या 61 व्या महासभेदरम्यान गुरुवारी (4 मे) रशिया आणि युक्रेनच्या नेत्यांमध्ये हाणामारी झाली. या परिषदेत, काळ्या समुद्राच्या प्रदेशातील देश आर्थिक, तांत्रिक आणि सामाजिक यावर बहुपक्षीय आणि द्विपक्षीय संबंध विकसित करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आले.

रशियन प्रतिनिधीला ठोसा

- Advertisement -

युक्रेनचे विशेष वार्ताहर आणि राजकीय सल्लागार जेसन जे स्मार्ट यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ शुक्रवारी (5 मे) सकाळपर्यंत 3 लाख लोकांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचवेळी युक्रेनचे संसदपटू अ‌ॅलेक्झांडर मारिकोव्स्की यांनी हा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला. मॅरिकोव्स्कीच्या पोस्टचा हवाला देत न्यूजवीकनेही या घटनेचे वृत्त दिले आहे.

व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की रशियन प्रतिनिधीने प्रथम आपल्या हातांनी युक्रेनचा ध्वज हिसकावला, त्यानंतर युक्रेनचे संसद सदस्य ओलेक्झांडर मारिकोव्स्की यांनी रशियन प्रतिनिधीला धक्काबुक्की केली.

रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढला

- Advertisement -

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंटही केल्या. इब्राहिम झेदान या युजरने लिहिले की रशियन प्रतिनिधी खरोखरच पंचास पात्र होता. त्यांनी युक्रेनच्या ध्वजाचा अपमान केला, जो कोणत्याही अजिबात योग्य नव्हता. या घटनेमुळे रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढला आहे.

( हेही वाचा: सिडनीतील स्वामी नारायण मंदिरावर हल्ला; गेटवर होते खलिस्तानी झेंडे )

दोन दिवसांपूर्वी रशियाने युक्रेनवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. युक्रेनने क्रेमलिन इमारतीवर ड्रोनने हल्ला केल्याचा आरोप आहे. मात्र, या हल्ल्यात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना कोणत्याही प्रकारे इजा झालेली नाही.

- Advertisment -