world no tobacco day 2021: ‘वर्ल्ड नो टोबॅको दिवस’ का साजरा केला जातो? कशी झाली सुरुवात? जाणून घ्या

world no tobacco day 2021 why celebrated world no tobacco day you know
world no tobacco day 2021: 'वर्ल्ड नो टोबॅको दिवस' का साजरा केला जातो? कशी झाली सुरुवात? जाणून घ्या

तंबाखू खाण्याची मज्जा केव्हाही आयुष्यभरासाठी सजा होऊ शकते. हे माहिती असूनही जगभरातीन अनेक लोक तंबाखूचे सेवन कोणत्याना कोणत्या मार्गातून करत आहेत. यामुळे स्वतः जीवघेण्या आजाराला आमंत्रण देत आहेत. म्हणून अशा लोकांना तंबाखू सेवन करण्यापासून रोखणे आणि तंबाखूमुळे आरोग्याला होणारे नुकसान याबाबत जागरूक करण्याच्या उद्देशाने जगभरात दरवर्षी ३१ मे रोजी ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ (world no tobacco day 2021) साजरा केला जातो. यादिवशी दरवर्षी एक विशेष थीमचे आयोजन केले जाते. यावर्षी २०२१मध्ये Commit to Quit ही थीम आहे.

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ कशी झाली सुरुवात?

जागतिक आरोग्य संघटनेद्वारे (WHO) १९८७ साली तंबाखूच्या सेवनाने होणाऱ्या मृत्यूची वाढ लक्षात घेऊन ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’ला सुरुवात झाली. हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त ७ एप्रिल १९९८ साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. परंतु यानंतर ३१ मे १९८८ रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या ठराव समंत झाल्यानंतर हा दिवस दरवर्षी ३१ मे रोजी साजरा करून लागले.’

‘या’ दिनामागचा नेमका उद्देश

तंबाखूचे सेवन करणे आणि धूम्रपान करणे आरोग्यासाठी खूप हानिकारण आहे. याच्या सेवनामुळे आरोग्यास गंभीर धोका उद्भवतो आणि अनेकदा जीवघेणा आजार शरीरात घर करतो. यामुळे हे सेवन केले नाही पाहिजे. जे लोकं तंबाखूचे सेवन कच्ची तंबाखू, बिडी-सिगारेट, पान मसाला, हुक्का कोणत्याही प्रकारे करत आहेत. त्यांना अशा प्रकारे सेवन केल्यामुळे होणाऱ्या नुकसानाविषयी समजवणे आणि तंबाखू सोडण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे. शिवाय जे तरुण या व्यसनाकडे वळत आहेत, त्यांना देखील या मार्फत समजवणे. हा ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ साजरा करण्यामागचा नेमका उद्देश आहे.