घरताज्या घडामोडीworld no tobacco day: धूम्रपान करणाऱ्यांनो सावधान! कोरोनामुळे ५० टक्के मृत्यूचा धोका...

world no tobacco day: धूम्रपान करणाऱ्यांनो सावधान! कोरोनामुळे ५० टक्के मृत्यूचा धोका जास्त; WHOचा इशारा

Subscribe

गेल्या वर्षभरापासून जीवघेण्या कोरोना महामारीमुळे चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. कोरोनाचा उद्रेक हा किती काळ असेल? हे सांगणे कठीण आहे. कोरोनामध्ये बदल होऊन दुसरी, तिसरी लाट येताना दिसत आहे. यादरम्यान धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे अनेक संशोधनातून सांगण्यात आले आहे. आता खुद्द जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुसांना नुकसान होणाऱ्या लोकांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचा धोका ५० टक्के जास्त असतो, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी २८ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, ‘धूम्रपान करणाऱ्यांमध्ये कोरोनाची गंभीरता आणि यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ५० टक्के जास्त असते. यामुळे कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी धूम्रपान करणे सोडणे भल्याचे आहे. धूम्रपान केल्यामुळे कॅन्सर, हृदयरोग आणि श्वसन रोगांचा धोका वाढतो.’

- Advertisement -

यासंबंधित गुरुग्राम येथील नारायणा रुग्णालयातील सल्लागार आणि सर्जन, हेड अँड नेक (डोके आणि मान) ऑन्कोलॉजी डॉक्टर शिल्पा शर्मा म्हणाले की, ‘जे लोक सध्या धूम्रपान करत आहेत त्यांनी हे व्यसन सोडण्याची आणखी एक कारण म्हणून कोरोना महामारीकडे पाहिले पाहिजे. त्यांनी कोरोनाग्रस्त असलेल्या आणि फुफ्फुसांची क्षमता गमावून बसलेल्या रुग्णांच्याबाबत माहिती घेऊन निरोगी फुफ्फुसांचे महत्त्व समजले पाहिजे आणि फुफ्फुसांचा बचाव करण्याची प्रतिज्ञा करायला पाहिजे.’

अॅक्शन कॅन्सर रुग्णालयातील वरिष्ठ सल्लागार, हेड अँड नेक (डोके व मान), ब्रेस्ट अँड थोरॅसिक ऑन्को सर्जरी युनिट डॉक्टर राजेश जैन यांच्या मते, ‘कोरोना किंवा फुफ्फुसांसंबंधित कोणत्याही संक्रमणा संदर्भात सर्वात पहिल्यात हे समजून घ्या की, फुफ्फुसे जेवढी निरोगी असतील संक्रमित व्यक्ती बरी होण्याची क्षमता तितकीच चांगली असेल. अशा परिस्थिती धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीचे फुफ्फुसे तुलनात्मदृष्ट्या कमकुवत असेल, तर कोरोनाबाधित झाल्यानंतर निमोनिया होण्याचा धोका जास्त असतो.’

- Advertisement -

हेही वाचा – world no tobacco day 2021: ‘वर्ल्ड नो टोबॅको दिवस’ का साजरा केला जातो? कशी झाली सुरुवात? जाणून घ्या


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -