Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Imaan Hazir Mazari: 'खरे दहशतवादी लष्करात बसलेत...' असं म्हणताच, पाकिस्तानी तरुणी झाली...

Imaan Hazir Mazari: ‘खरे दहशतवादी लष्करात बसलेत…’ असं म्हणताच, पाकिस्तानी तरुणी झाली किडनॅप

Subscribe

माजी कॅबिनेट मंत्री शिरीन मजारी यांची मुलगी इमान मजारी हिचे पाकिस्तानमध्ये अपहरण करण्यात आले आहे. इमान मजारी या इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या, पाकिस्तानी लष्कराविरोधात निघालेल्या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी पाकिस्तानी लष्कराला दहशतवादी म्हटले होते. त्यानंतर त्यांचं अपहरण करण्यात आलं.

इस्लामाबाद: माजी कॅबिनेट मंत्री शिरीन मजारी यांची मुलगी इमान मजारी हिचे पाकिस्तानमध्ये अपहरण करण्यात आले आहे. इमान मजारी या इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या, पाकिस्तानी लष्कराविरोधात निघालेल्या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी पाकिस्तानी लष्कराला दहशतवादी म्हटले होते. या रॅलीत पीटीआय समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. रॅलीमध्ये तुरुंगात असलेल्या इम्रान खानची लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी करण्यात आली. या रॅलीत इम्रान खान यांच्या पक्षातील अनेक बडे नेते सहभागी झाले होते. यानंतर शिरीन मजारी यांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. इम्रान खान यांच्या सरकारमध्ये शिरीन मजारी या मानवाधिकार मंत्री होत्या. (world Pakistan Shireen mazari says police abducted her daughter imaan hazir after speech against pakistan army)

शिरीन मजारी यांचा आरोप काय?

रात्री आलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी आपल्या मुलीचे अपहरण केल्याचा आरोप शिरीन मजारी यांनी केला. त्यांनी ट्विट करून लिहिले की, महिला पोलीस आणि काही साध्या वेशातील लोकांनी आमच्या घराचा दरवाजा तोडून माझ्या मुलीला पळवून नेले आहे. त्यांनी आमचे सुरक्षा कॅमेरे, लॅपटॉप आणि मुलीचा फोन काढून घेतला आहे. अपहरण केलेल्या लोकांनी संपूर्ण घराची झाडाझडती केली. माझी मुलगी त्यावेळी नाईट ड्रेसमध्ये होती. तिला कपडे बदलायलाही वेळ दिला नाही, त्यांनी तिला ओढून नेलं. त्यांच्याकडे कोणतंही वॉरंट नव्हते आणि कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली नव्हती. ही सरकारची हुकूमशाही आहे. लक्षात ठेवा, आम्ही दोन स्त्रियाच घरात राहतो. हे एक प्रकारचे अपहरण आहे, असं शिरिन मजारी म्हणाल्या.

- Advertisement -

( हेही वाचा: लॅंडीग आधीच रशियायाचे लूना-25 चंद्रावर कोसळले; आता भारताच्या चांद्रयान-3 कडे जगाचे लक्ष )

शाह महमूद कुरेशीलाही अटक करण्यात आली होती

काही तासांपूर्वी पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (FIA) अटक केली होती. शाह महमूद कुरेशी हे इम्रान खान यांचे सर्वात जवळचे विश्वासू आणि त्यांच्या पक्ष पीटीआयचे उपाध्यक्ष देखील आहेत. इम्रान खानच्या अटकेनंतर पीटीआयची कमान कुरेशी यांच्या हातात होती. त्याच्या अटकेनंतर एफआयए टीम कुरेशीला त्याच्या इस्लामाबाद येथील मुख्यालयात घेऊन गेली. तुरुंगात असलेल्या इम्रान खानकडून गहाळ झालेल्या राजनैतिक कागदपत्रांप्रकरणी कुरेशीला अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांचे सरकार पाडणाऱ्या परकीय षड्यंत्राचे पुरावे त्यांच्याकडे असल्याचा दावा इम्रान खान दीर्घकाळापासून करत आहेत. गोपनीय राजनयिक कागदपत्रांची बाब समोर आली तेव्हा कुरेशी परराष्ट्र मंत्रीपदावर होते.

- Advertisement -

- Advertisment -