घरट्रेंडिंगWorld TB Day 2021: सामान्य खोकला आणि टीबी आजारातील काय आहे नेमकं...

World TB Day 2021: सामान्य खोकला आणि टीबी आजारातील काय आहे नेमकं अंतर

Subscribe

बर्‍याच जणांना नेहमी खोकल्याचा त्रास असतो, परंतु प्रत्येक खोकणाऱ्या व्यक्तीला टीबी म्हणजेच क्षयरोगाचा आजार असतो, असे नाही. खरं तर, टीबी आणि सामान्य खोकला हे ओळखू शकणारे काही मुख्य लक्षणं आहेत. टीबी या आजाराची लक्षणे कितीही धोकादायक असली तरी त्याचे योग्य उपचार केल्यास क्षयरोगापासून सुटका होऊ शकते.

टीबी म्हणजे नेमकं काय ?

टीबी अर्थात क्षयरोग. क्षयरोग हा बॅक्टेरियामुळे होणारा एक फुफ्फुसाचा आजार आहे. हा एक संसर्गजन्य रोग असून जो रुग्णाच्या लाळ, श्लेष्मा आणि त्याच्या संपर्कात असल्याने होतो. फुफ्फुसांव्यतिरिक्त गर्भाशय, हाडे, मेंदू, यकृत, मूत्रपिंड आणि घशात देखील क्षयरोग देखील होऊ शकतो. फुफ्फुसांच्या टीबी व्यतिरिक्त इतर अवयवांना क्षयरोगाचे संक्रमण होऊ शकत नाही.

- Advertisement -

का धोकादायक मानला जातो टीबी आजार

जेव्हा क्षयरोगाचा रुग्ण शिंकतो, तेव्हा त्या रूग्णाच्या तोंडातून १० हजार थेंब बाहेर पडतात. तर खोकला आल्यास ३ हजार थेंब तोंडाद्वारे बाहेर पडतात. त्यामुळे टीबीच्या रूग्णाला शिंकताना किंवा खोकताना रुमाल तोंडावर धरणे आवश्यक आहे. कारण त्याचे संक्रमण खूप वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. याशिवाय टीबी शरीराच्या ज्या भागात पसरतो, त्या भागाला योग्य उपचार न मिळाल्यास पूर्णपणे निरुपयोगी होतो. गर्भाशय टीबीमुळे वंध्यत्व येते, फुफ्फुसातील क्षयरोगामुळे, ते कमकुवत होते. तसेच मेंदूच्या क्षयरोगामुळे रुग्णाला मेंदूचे आजार होतात आणि हाडांच्या टीबीमध्ये हाडे ठिसूळ होण्यास सुरवात होते.

खोकला आणि टीबी आजारातील फरक

साधारण खोकला आल्यास घशात सूज येते. तसेच बोलताना घसा खवखवण्याची समस्या निर्माण होते. तर बोलताना काही प्रमाणात घशात वेदना निर्माण होऊ शकतात. टीबीच्या खोकलाचे मूळ कारण टीबीचे बॅक्टेरिया होण्यास कारणीभूत असतात. जे त्याच्या प्रसारासाठी रूग्णाच्या शरीरात खोकला निर्माण करणारे रेणू तयार करतात. टीबी मायकोबॅक्टीरियम क्षयरोग नावाच्या बॅक्टेरियमद्वारे पसरते, ज्यामुळे फुफ्फुसांचा आजार संभवण्याचा धोका सर्वाधिक असतो.

ही आहेत लक्षणे

  • वजन कमी होणं
  • भूक न लागणे
  • खोकताना घशातून रक्तस्त्राव होणं
  • खोकला ३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहणे
  • संध्याकाळी किंवा रात्री ताप असणं
  • श्वास घेताना छातीत दुखणं
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -