घरदेश-विदेश2023 मध्ये होणार तिसरे महायुद्ध? बाबा वेंगाची भविष्यवाणी होणार खरी

2023 मध्ये होणार तिसरे महायुद्ध? बाबा वेंगाची भविष्यवाणी होणार खरी

Subscribe

रशिया आणि युक्रेनच्या युद्धाने जगभरामध्ये तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला आहे. मागील अनेक महिन्यांपासून या युद्धामुळे युक्रेन आणि रशियातील अनेक शहरं उद्धवस्त झाली आहेत. दरम्यान, या सर्व घटनांची भविष्यवाणी अनेक वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंगाने केली होती. बाबा वेंगाच्या या भविष्यवाणीप्रमाणे आताचे हे युद्ध तिसरे महायुद्ध करण्यास नक्कीच कारणीभूत ठरु शकते.

2023 मध्ये होणार तिसरे महायुद्ध?
रशिया-युक्रेनचे हे युद्ध मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहे. या दरम्यान जगभरातील अनेक नेत्यांनी तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता वर्तवली. या युद्धात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी देखील परमाणु हल्ले केले आहेत. या सर्व घटना बाबा वेंगाद्वारे करण्यात आलेल्या भविष्यवाणीची आठवण करुन देतात. बाबा वेंगाने 2023 मध्ये तिसरे महायुद्ध होण्याची भविष्यवाणी सांगितली होती. इतकंच नव्हे तर प्रसिद्ध भविष्यवेत्ता नास्त्रेदमसने देखील तिसरे महायुद्ध होण्याची भविष्यवाणी केली होती.

- Advertisement -

संपूर्ण जगाला भोगावा लागणार तिसऱ्या महायुद्धाचा परिणाम
मिळालेल्या माहितीनुसार, जर तिसरे महायुद्ध झाले तर जगभरातील लोकांचे खूप नुकसान होईल. या युद्धामुळे निसर्गाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होईल.

कोण होत्या बाबा वेंगा?
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा वेंगा एक फकीर होती. जी बुल्गारियामध्ये राहणारी होती. त्यांचा जन्म 1911 मध्ये झाला, वयाच्या 12 व्या वर्षी ते दृष्टीहीन झाले. असं म्हणतात की, त्यांनी केलेल्या 85 टक्के भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. तर काही दावे खोटे देखील ठरले आहेत. शिवाय त्यांनी सांगितलेल्या भविष्यवाण्या कुठेही लिहिलेल्या नाहीत. बाबा वेंगांनी या भविष्यवाण्या त्यांच्या अनुयायींना सांगितल्या होत्या आणि त्यांनी या लिहिल्या. 1996 मध्ये बाबा वेंगा यांचा मृत्यू झाला. मात्र, मरणापूर्वी त्यांनी वर्ष 5079 पर्यंतच्या भविष्यवाण्या केल्या आहेत. कारण बाबा वेंगांच्या मते 5079 जग नष्ट होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

कोण होत्या बाबा वेंगा? ज्यांची भविष्यवाणी नेहमी ठरते खरी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -