Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश WorldEmojiDay: इंटरनेटवर सर्वाधिक वापरला जाणारा इमोजी कोणता,जाणून घ्या इमोजीचा रंजक इतिहास

WorldEmojiDay: इंटरनेटवर सर्वाधिक वापरला जाणारा इमोजी कोणता,जाणून घ्या इमोजीचा रंजक इतिहास

भारतातील इंटरनेट युजर्स सर्वाधीक अत्याधीक आनंद म्हणजेच आनंदाश्रू वाल्या इमोजीचा तसेच 'ब्लोइंग अ किस' इमोजीचा वापर करतात.

Related Story

- Advertisement -

 

आज संपुर्ण जगभरात 17 जुलै रोजी जागतीक इमोजी दिन(World Emoji Day) साजरा करण्यात येत आहे. या दिवसाची सुरूवात साल 2014 झाली होती. सोशल मीडिया तसेच इंटरनेटच्या वाढत्या जागतिकीकरणामुळे इमोजीचा वापर सुद्धा वाढत गेला. इमोजी डे च्या इतिहासाबद्दल सांगायचे झाल्यास ऑस्ट्रेलिया मधील जेरेमी बर्जने या रंजक दिवसाची सुरूवात केली होती. आपल्या व्हॉट्सॲप चॅट पासून ते व्हॉट्सॲप स्टेटस,मैसेज,ट्वीड,फेसबुक,इंस्टग्राम,स्नॅपचॅट सारख्या विभिन्न सोशल मीडिया पॅल्टफॉमचा इमोजी एक महत्वपुर्ण भाग बनला आहे. इमोजीच्या माध्यमातून कोणताही व्यत्ती आपल्या भावना क्षणार्धात मांडू शकतो. ‘इमोजी’ हा शब्द जपानी भाषेतील शब्द म्हणजेच इ (पिक्चर) आणि मोजी (पात्र) या शब्दाने तयार करण्यात आला आहे. एका संशोधनात हि बाब समोर आली आहे की भारतातील इंटरनेट युजर्स सर्वाधिक आनंद म्हणजेच आनंदाश्रू वाल्या इमोजीचा तसेच ‘ब्लोइंग अ किस’ इमोजीचा वापर करतात.(WorldEmojiDay: What is the most used emoji on the internet, find out the interesting history of emoji)

- Advertisement -

स्मायली फेसचा आज सर्वात जास्त वापर केला जातो त्याला अमेरिकामधील हार्वी रोस बॉल याने तयार केलं होतं. हळूहळू स्मायलीची लोकप्रियता वाढली. आणि आज प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉमवर याचा वापर करण्यात येतो. जेरेमी बर्ज यांनी 2014 साली वर्ल्ड इमोजी डे सुरुवात केली होती. तसेच बर्ज इमोजीपीडियाचे फाउंडर असून त्यांना 2019 मध्ये स्माइलिंग फेस विथ हार्ट याला मोस्ट पॉपुलर न्यू इमोजीचा अवॉर्ड देखील देण्यात आला होता.


- Advertisement -

हे हि वाचा – देशातले पहिले Grain ATM, एका मिनिटात येणार १० किलो गहू

- Advertisement -