घरदेश-विदेशऐकावं ते नवलच! 'या' वृद्धाने 67 वर्षांपासून अंघोळच केली नाही; कारण वाचून...

ऐकावं ते नवलच! ‘या’ वृद्धाने 67 वर्षांपासून अंघोळच केली नाही; कारण वाचून थक्क व्हाल

Subscribe

त्याच वेळी त्यांच्या शरीरात काही आजार किंवा व्याधी आहेत का हे जाणून घेण्यासाठी अनेक तज्ज्ञ त्यांच्याकडे आले. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या शरीरात कोणताही आजार नसल्याचे समोर आले आहे.

डॉक्टर अनेक वेळा सांगतात की, चांगल्या आरोग्यासाठी अंघोळ करणे खूप महत्वाचे आहे. मात्र एक व्यक्तीने हा सिद्धांत चुकीचा असल्याचे सिद्ध केले आहे. या व्यक्तीने अनेक दशकांपासून अंघोळचं केलेली नाही. इतकेच नाही तर त्याला घर देखील नाही, तो तलावाचे, डबक्यातले पाणी पिऊन राहतो. तर भुकेला चक्क रस्त्याच्या कडेला मरुण पडलेले प्राणी खातो. असे असूनही तो पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त आहे. या व्यक्तीचे ‘परफेक्ट हेल्थ’ पाहून शास्त्रज्ञ आणि डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे या वृद्धाचे वय आता 87 वर्षे आहे.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, इराणमधील रहिवासी अमो जाजी असे वृद्धाचे नाव आहे. अमो जाजी यांचे वय ८७ वर्षे आहे. ते  आजही पूर्णपणे निरोगी आहे. त्यांची जीवनशैली ज्या प्रकारची आहे ते पाहून शास्त्रज्ञांनाही थक्क झालेत. कारण त्यांच्या मते, हा वृद्ध आजही पूर्णपणे तंदुरुस्त आहेत.

- Advertisement -

त्याच वेळी त्यांच्या शरीरात काही आजार किंवा व्याधी आहेत का हे जाणून घेण्यासाठी अनेक तज्ज्ञ त्यांच्याकडे आले. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या शरीरात कोणताही आजार नसल्याचे समोर आले आहे. मात्र हे वृद्ध आजही अजिबात स्वच्छ राहत नाही. त्यांनी 67 वर्षांपासून अंघोळचं केली नाही. त्यांना वाटते की, त्यांनी आंघोळ केली तर ते त्यांच्यासाठी अशुभ ठरेल आणि त्यांचा मृत्यू होईल.

अमो जाजींचा आहार

आता ते काय खातात, तेही सांगतो. ही वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला मेलेली जनावरे खातात. तर डबक्याचे घाण पाणी पिते. त्याच्या या विचित्र जीवनशैलीमुळे त्याचा कोणीही मित्र नाही. मात्र, देजगाह (इराण) येथे राहणारे स्थानिक ग्रामस्थ सांगतात की, ते त्यांच्या जीवनशैलीने खूप प्रभावित झाले आहेत. कारण तो आजारी पडलेला नाही किंवा त्याला कोणत्याही विषाणूचा फटका बसलेला नाही.

- Advertisement -

यावर प्राध्यापक डॉ. घोलमरेजा मोलवी काय म्हणाले, आम्ही या व्यक्तीच्या काही चाचण्या केल्या. पण मजबूत प्रतिकारशक्तीमुळे तो निरोगी आहे. त्याच वेळी, विशेष गोष्ट म्हणजे 87 वर्षीय व्यक्तीची जीवनशैली ऐकून लोकांना विचित्र वाटेल. पण तो सतत चालू घडामोडींमध्ये अपडेट असतो. रशियन क्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांती यावरही तो लोकांशी चर्चा करत असतो.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -