घरदेश-विदेशपहिली-वहिली 'टेस्ट ट्यूब बेबी' झाली ४० वर्षांची

पहिली-वहिली ‘टेस्ट ट्यूब बेबी’ झाली ४० वर्षांची

Subscribe

लुईस जॉय ब्राऊन असं या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचं नाव असून, तिने नुकताच आपला चाळीसावा बर्थडे साजरा केला आहे.

अलीकडच्या काळात भारतामध्येही ‘टेस्ट ट्यूब बेबीची’ संकल्पना हळूहळू रुजायला लागली आहे. ‘टेस्ट ट्यूब’ प्रणालीने बाळ जन्माला घालणं ही विज्ञानातील खूप मोठी प्रगती म्हणावी लागेल. टेस्ट ट्यूब बेबीचा पहिला प्रयोग झाला होता आजपासून सुमारे ४० वर्षांपूर्वी. इंग्लडंच्या ओल्डहॅम जनरल हॉस्पिटलमध्ये जुलै १९७८ मध्ये पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला होता. त्यावेळी या मुलीला ‘बेबी ऑफ द सेंच्युरी’ असा खिताब देण्यात आला होता. त्याकाळी अशाप्रकारचा प्रयोग लोकांसाठी खूपच नवीन होता. आज जगातली ‘ती’ पहिली टेस्ट ट्यूब बेबी ४० वर्षांची झाली आहे. लुईस जॉय ब्राऊन असं या महिलेचं नाव असून तिने नुकताच आपला चाळीसावा बर्थडे साजरा केला आहे. जगातल्या पहिल्याच टेस्ट ट्यूब बेबीने चाळीशी गाठल्याबद्दल, जगभरात तिची चर्चा होत आहे. लुईसच्या आईने ९ वर्श गर्भधारणा न झाल्यामुळे त्यावेळी टेस्टट्यूबचा पर्याय स्विकारला होता. लुईस पहिलीच टेस्ट ट्यूब बेबी असल्यामुळे तिच्या जन्माचे ते क्षण टिपण्यासाठी फोटोग्राफर्सनी आणि पत्रकारांनी हॉस्पिटलबाहेर एकच गर्दी केली होती. गर्दीला कंट्रोल करण्यसाठी विशेष पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

worlds first test tube baby louise brown
लुईस ब्राऊन तिच्या परिवारासोबत (सौजन्य- सोशल मीडिया)

लुईस सर्वसामान्यच…

एकीकडे लुईसच्या जन्माचा जल्लोष साजरा केला जात होता. मात्र, दुसरीकडे तिच्या आईला एक चिंता सतावत होती. लुईस टेस्ट ट्यूब प्रणालीतून जन्माला आलेलं पहिलंच बाळ असल्यामुळे ती सर्वसामान्य मुलींप्रमाणेच असेल की नाही ही चिंता तिच्या आईला लागून राहिली होती. त्यावेळी डॉक्टरांनी लुईसच्या ६० हून अधिक चाचण्या केल्या. सुदैवाने या चाचण्यांमधून लुईस अन्य मुलींसारखीच सर्वसामान्य असल्याचे निष्पन्न झाले. लुईसने स्वत:चे आत्मचरित्रही लिहीले आहे. या आत्मचरित्रात एक टेस्ट ट्यूब बेबी म्हणून तिला वाट्याला आलेले अनेक चांगले-वाईट अनुभव लिहिले आहेत. आज लुईसचं स्वत:चं कुटुंब असून ती त्यांच्यासोबत सुखाने नांदते आहे.

- Advertisement -

उपलब्ध माहितीनुसार आजच्या तारखेला संपूर्ण जगात ८० लाखांहून अधिक टेस्ट ट्यूब बेबीज आहेत. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दरवर्षी साधारण ५ लाख मुलांचा जन्म होत असतो. भारतातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचं नाव हर्षा चावडा असून, ऑगस्ट १९८६ मध्ये तिचा जन्म झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -