घरदेश-विदेशजगातील सर्वात वजनदार मुलाचे ऑपरेशन यशस्वी

जगातील सर्वात वजनदार मुलाचे ऑपरेशन यशस्वी

Subscribe

जगातील सर्वात वजनदार मुलाची बॅरियाट्रिक ऑपरेशन यशस्वी झाले आहे. दिल्लीमध्ये रहाणाऱ्या मिहीर जैन याचे वजन २३७ किलो होते. ऑपरेशननंतर त्याचे वजन ६० किलोने कमी झाले आहे.

जगातील सर्वात जास्त वजन असलेल्या मुलाचे ऑपरेशन झाले. २३७ किलो वजन असलेल्या या मुलावर बॅरियाट्रिक सर्जरी करण्यात आली. दिल्लीच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार झाले. हा जगातील सर्वात वजनदार मुलगा असून ऑपरेशननंतर त्याचे वजन ६० किलोने कमी झाले आहे.

मिहिर जगातील सर्वात वजनदार मुलगा

दिल्लीच्या १४ वर्षिय मिहीर जैन याचे वजन २३७ किलो आहे. दोन महिन्यापूर्वी त्याचे ऑपरेशन झाले. डॉक्टरांनी ऑपरेशननंतर झालेला प्रभाव पाहण्यासाठी दोन महिन्यापर्यंत त्याच्या ऑपरेशनची माहिती मीडियाला दिली नाही. मात्र मंगळवारी हॉस्पिटलने या ऑपरेशनची आणि त्याच्या वजन कमी झाल्याची माहिती सांगितली. या मुलाचे ऑपरेशन दिल्लीत्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये झाले. वरिष्ठ बैरियाट्रिक सर्जन डॉ. प्रदीप चौबे यांनी त्याचे ऑपरेशन केले होते.

- Advertisement -

५ वर्षाचा असताना होते ६० किलो वजन

मिहिर दिल्लीच्या पुजा जैन आणि राजेश जैन यांचा मुलगा आहे. नोव्हेंबर २००३ मध्ये त्याचा जन्म झाला. तेव्हा त्याचे वजन फक्त अडीच किलो होते. त्यानंतर हळूहळू त्याचे वजन वाढू लागले. मिहिर पाच वर्षाचा असताना त्याचे वजन ६० किलो होते. वजन वाढत असल्याने तसेच उठायला, बसायला आणि चालायला त्रास होत असल्याने मिहिरने दुसरीनंतर शाळेत जाणे बंद केले आणि घरीच अभ्यासाला सुरुवात केली.

“दुसऱ्यांची मुलं बाहेर खेळायला जायची, शाळेत जायची मात्र माझा मुलगा घरामध्येच एका ठिकाणी बसून रहाणे हे पाहणे मला अवघड जात होते. माझा एक मुलगा घरामध्ये बसून तर दुसरी मुलगी बाहेर जायची. त्यामुळे मी खूप दु:खी होत असे.” – पुजा जैन, मिहिरची आई

एका जागेवर बसून मिहिर झाला निराश

मिहिरचे वजन दिवसेंदिवस वाढत चालले होते. त्यामुळे तो बेडवरच झोपून असायचा. त्याला उठायला, बसायला आणि चालालायला खूप त्रास होत होता. ऐवढेच नाही तर लठ्ठपणा वाढल्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच त्याचे डोळे पूर्णत: बंद झाले होते. मिहिरच्या वजनामुळे त्याला शाळेत घेऊन जाणे कुटुंबियांना कठीण झाले होते. एका जागेवरच दिवसभर बसून राहवे लागत असल्याने मिहिर खूप चिडचिड करायचा. प्रत्येक मुलाला इथे-तिथे जायचे असते. मित्रांसोबत वेळ घालवायचा असतो. पण त्याला ते करता येत नसल्यामुळे तो खूप निराश झाला होता.

- Advertisement -

ऑपरेशनमध्ये येत होत्या अडचणी

मिहिरच्या छातीवर १० ते १२ इंचाचे फॅट जमा झाले होते. त्यामुळे त्याच्या ऑपरेशनामध्ये अडथळे येत होते. मिहिरला मधुमेह, श्वसन समस्या आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ऑपरेशनपूर्वी त्याला आहारामध्ये पथ्य पाळण्यास डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे त्याचे वजन बऱ्यापैकी कमी झाले होते. ऑपरेशनवेळी मिहिरचे वजन १९६ किलो होते. तर ऑपरेशननंतर त्याचे वजन १७७ किलो झाले आहे. मिहिरचे वजन १०० किलोपर्यंत कमी करण्याचे टार्गेट डॉक्टरांनी ठेवले आहे. पण आता ऑपरेशननंतर मिहिर चालू लागला आहे. तसंच त्याचा श्वसनाचा त्रास देखील कमी झाला आहे.

काय असते बॅरियाट्रिक ऑपरेशन?

बॅरियाट्रिक ऑपरेशनमध्ये पोटाचा आकार छोटा केला जातो. यामध्ये ऑपरेशननंतर व्यक्तीला भूख कमी लागते. त्याचसोबत भूख वाढवणारे हार्मोन्स शरिरामध्ये तयार होणे बंद होते. यामुळे शरीरामध्ये जमा होणारे फॅट एनर्जीच्या रुपात खर्च होतात. आणि वजन लवकर कमी होते. या ऑपरेशननंतर आहारामध्ये पथ्य पाळणे गरजेचे असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -