घरट्रेंडिंगकचऱ्यात सापडलेल्या जीन्ससाठी लोकांची झुंबड, किंमत ९४ लाख रुपये

कचऱ्यात सापडलेल्या जीन्ससाठी लोकांची झुंबड, किंमत ९४ लाख रुपये

Subscribe

एका जुन्या जीन्सची सध्या जगभऱात चर्चा आहे . कारण ही जीन्स चक्क १८५७ साली समुद्रात बुडालेल्या जहाजात सापडली आहे.

फॅशनच्या दुनियेत जीन्स म्हणजे तरुणाई. म्हणूनच जीन्स आवडणाऱ्यांची बातच काही ओर असते. त्यातच जीन्सप्रेमींना नव्या जीन्सपेक्षा जुनी जीन्स अधिक स्टायलिस्ट वाटते. यामुळे जीन्स जितकी जुनी तितके तुम्ही स्टायलिस्ट दिसता म्हणूनच अनेकजण वर्षानुवर्ष झालेल्या जीन्सचे क्रेझ असते. अशाच एका जुन्या जीन्सची सध्या जगभऱात चर्चा आहे . कारण ही जीन्स चक्क १८५७ साली समुद्रात बुडालेल्या जहाजात सापडली आहे.

अमेरिकेतील उत्तर कॅरोलिनामध्ये हे जहाज बुडाले होते. त्या जहाजाच्या सांगाडयात अडकलेल्या कचऱ्यात इतर सामानाबरोबर ही जीन्स सापडली आहे. या जीन्सचा लिलाव करण्यात आला. यावेळी लिलावात ही जीन्स ९४ लाखात विकण्यात आली . जगातील सर्वात जुनी आणि सर्वात महागडी जीन्स म्हणून तिची नोंद झाली आहे.

- Advertisement -

या जीन्सला ५ बटन आहेत. सफेद रंगाची ही जीन्स लेवी स्ट्रॉस कंपनीची असल्याचा दावा काहीजण करत आहेत. तर लेवी स्ट्रॉस अँड कंपनीने पहीली जीन्स १८७३ साली तयार केली होती. यामुळे सापडलेली जीन्स ही लेवीच्या आधी १६ वर्षांपूर्वीची आहे. तर काहींच्या मते या जीन्सचे कनेक्शन लेवी स्ट्रॉसशी असून ही कंपनी एकेकाळी कच्च्या मालाची विक्री करत होती. यामुळे सापडलेली जीन्स पॅंट हे वेगळेच वर्जन असल्याचे बोलले जात आहे. यावर इतिहासकार ट्रेसी पानेक यांनी ही जीन्स पॅंट लैवीची नसल्याचे स्पष्ट केले आहे.यामुळे ही जीन्स कोणत्या कंपनीने तयार केली यावरून संभ्रम असला तरी ही तरी एक गोष्ट मात्र नक्की की ही जीन्स १२ सप्टेंबर १८५७ आधीच तयार करण्यात आली . कारण ही जीन्स ज्या जहाजावर सापडली ते एका वादळात १२ सप्टेंबर १८५७ साली बुडाले होते. हे जहाज सन फ्रान्सिस्कोहून पनामा आणि तेथून न्यूर्यॉर्क जात होते. त्यावेळी त्याला जलसमाधी मिळाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -