घरताज्या घडामोडीजगभरात कोरोनाने गाठला ८ कोटींचा आकडा, २४ तासात ६ लाख ४६ हजार...

जगभरात कोरोनाने गाठला ८ कोटींचा आकडा, २४ तासात ६ लाख ४६ हजार नवे रूग्ण

Subscribe

जगभरात कोरोनाचे वाढते आकडे हे सगळ्यांच्याच चिंतेचा विषय ठरत आहेत. आता जगभरातला कोरोनाच आकडा हा 8 कोटींवर पोहचला आहे. तर कोरोनाच्या महामारीत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ही १७ लाख ४८ हजार इतकी झाली आहे. तर कोरोनावर उपचार घेऊन बरे झालेल्यांचा आकडा आता ५ कोटी ६१ लाख इतका आहे.

जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाच्या लशीचे वितरण सुरू झाले आहे खरे, पण तरीही अनेक देशात कोरोनाच्या महामारीचा धोका अजुनही कायमच आहे. जगभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून कोरोना रूग्णांचे आकडे आता समोर येऊ लागले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये जगभरात ६ लाख ४६ हजार नवीन कोरोना रूग्णांची भर पडली आहे. तर कोरोना संक्रमणामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ही ११ हजार ५१० इतकी आहे. कोरोनाचा सर्वात मोठा फटका बसलेले देश हे भारत, अमेरिका, ब्राझील हे आहेत. सर्वात शक्तीशाली समजला जाणारा देश असणाऱ्या अमेरिकेतही सर्वात जास्त लोक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यापाठोपाठ मेक्सिको, ब्राझील, रूस, ब्रिटन, जर्मनी, इटली, पोलंड, भारत यया देशांमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. जगभरात कोरोनाचा उच्चांक म्हणजे १७ डिसेंबरला ७ लाख ३८ हजार नवी कोरोना रूग्ण सापडले होते. तर सर्वाधिक असे १३ हजार ७८३ मृत्यू झाले होते. जगभरात सध्या २ कोटी १८ लाख लोक अजुनही कोरोनामुळे संक्रमित आहेत. त्यांच्यावर विविध ठिकाणी सध्या उपचार सुरू आहे.

- Advertisement -

जगभरातील टॉप टेन देश

जगभरात सर्वात टॉप असणाऱ्या देशात अमेरिकेचा समावेश आहे. सर्वात वेगवान अशा पद्धतीने कोरोनाच्या नव्या केसेस अमेरिकेत सापडत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेत ७५ हजार नवीन कोरोनाचे रूग्ण आढळले, त्यासोबतच २६३९ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात सध्या १ कोटींपेक्षा जास्त लोक कोरोनामुळे संक्रमित झाले आहेत. गेल्या २४ तासात भारतात २४ हजार नवीन कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. कोरोनामुळे प्रभावित असलेल्या देशापैकी एक ब्राझिलमध्ये २४ तासांमध्ये ५७ हजार नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

कोणत्या देशात किती मृत्यू ?

जगभरात २७ देशांमध्ये कोरोनाच्या संक्रमणामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५ लाख इतकी झाली आहे. त्यामध्ये इटली, पेरू, दक्षिण आफ्रिका, ईराण, जर्मनी, पोलंड, चीली या देशांचा समावेश आहे. जगभरात १७ देशांमध्ये कोरोनामुळे २० हजार पेक्षा जास्त रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये १२ असे देश आहेत ज्याठिकाणी कोरोनामुळे ४० हजाराहून अधिक मृत्यू झाले आहेत. तर अवघ्या सहा देशांमध्ये कोरोनामुळे झालेल्या एकुण मृत्यूपैकी ५४ टक्के इतके मृत्यू झाले आहेत. हे देश म्हणजे अमेरिका, ब्राझील, भारत, मेक्सिको, इटली, ब्रिटन हे आहेत.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -