घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronavirus: जगात कोनामुळे ४ लाख १८ हजार ८७२ जणांचा मृत्यू

Coronavirus: जगात कोनामुळे ४ लाख १८ हजार ८७२ जणांचा मृत्यू

Subscribe

जगभरात कोरोना व्हायरसने ७४ लाख ५१ हजार ५३२ लोक बाधित झाले आहेत. तर ४ लाख १८ हजार ८७२ लोक मृत्यू पावले आहेत.

जगभरात कोरोना व्हायरसमुळे थैमान माजले आहे. अनेक देशांनी लॉकडाऊन घोषित करुन देखील कोरोना व्हायरसचे संक्रमण काही केल्याने थांबत नाही. जगभरात कोरोना व्हायरसने ७४ लाख ५१ हजार ५३२ लोक बाधित झाले आहेत. तर ४ लाख १८ हजार ८७२ लोक मृत्यू पावले आहेत. तर आतापर्यंत ३७ लाख ३३ हजार लोक बरे देखील झाले आहेत. लॉकडाऊनमुळे एका बाजुला अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे, तर दुसऱ्या बाजुला कोरोना व्हायरसमुळे लोक संक्रमित होत आहेत, या दुहेरी संकटामध्ये जग सध्या अडकले आहे.

भारतातील मृत्यूचा आकडा ८ हजार पार

दिवसेंदिवस भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. भारतात सध्या २ लाख ८७ हजार १५५ कोरोनाबाधितांना कोरोनाची बाधा झाली असून आतापर्यंत ८ हजार १०७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर आतापर्यंत १ लाख ४० हजार ९७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

अमेरिकेत १ लाखाहून अधिक जणांचा मृत्यू

अमेरिकेत आतापर्यंत २ लाख ०६६ हजार ४०१ जणांना कोरोनाचीबाधा झाली आहे. तर १ लाख १५ हजार १३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ८ लाख ८ हजार ४९४ लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

ब्राझीलमध्ये ३९ हजार जणांचा मृत्यू

ब्राझीलमध्ये आतापर्यंत ७ लाख ७५ हजार १८४ जणांना कोरोनाचीबाधा झाली आहे. तर ३९ हजार ७९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३ लाख ९६ हजार ६९२ लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधान मोदी आणि इस्त्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यात कोरोना लस बनवण्यावर चर्चा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -