जगभरात कोरोनामुळे ६४ हजार लोकांचा मृत्यू

जगभरात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले असून आतपर्यंत ६४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

cornavirus death troll increase
चीन मधील कोरोना बाधितांवर उपचार करतानाचे चित्र

जगभरात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. रोज हजारो लोकांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. तर शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. कोरोना व्हायरसमुळे गेल्या काही दिवसातील जगभरातील मृतांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हा व्हायरस अतिशय भयंकर असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जगभरात १२ लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मृतांची संख्या ऐकून धक्काच बसेल. मृतांनी तर ६४ हजारचा आकडा पार केला आहे.

जगभरात मृत्यूची संख्या

जगभरात कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ६४ हजार ७२७ इतकी झाली आहे.

कोरोनाबाधितांची संख्या

आतापर्यंत जगात १२ लाख १ हजार ९६४ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ही आकडेवारी पाहून अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या

जगभरात कोरोनाची लागण होऊन अनेक जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत २ लाख ४६ हजार ६३८ लोक करोनामुक्त झाले आहे.

इटलीमधील २० हजार लोक झाले बरे

इटलीमध्ये आतापर्यंत १५ हजार ३६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १ लाख २४ हजार ६३२ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर २० हजार ९९६ लोक बरे झाले आहेत.

चीनमध्ये ७६ हजार लोक झाले बरे

चीनमध्ये आतापर्यंत ३ हजार ३२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ८१ हजार ६६९ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर ७६ हजार ९६४ लोक बरे झाले आहेत.

अमेरिकेत सर्वात अधिक लागण

अमेरिकेमध्ये आतापर्यंत ८ हजार ४५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ३ लाख ११ हजार ६३५ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर १४ हजार ८२५ लोक बरे झाले आहेत.

स्पेनमध्ये ८० हजार लोकांना लागण

स्पेनमध्ये आतापर्यंत ११ हजार ९४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १ लाख २६ हजार १६८ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर ३४ हजार २१९ लोक बरे झाले आहेत.

जर्मनीतील संख्या

जर्मनीमध्ये आतापर्यंत १ हजार ४४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ९६ हजार ९२ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर २६ हजार ४०० लोक बरे झाले आहेत.

फ्रान्समधील संख्या

फ्रान्समध्ये आतापर्यंत ७ हजार ५६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ८९ हजार ९५३ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर १५ हजार ४३८ लोक बरे झाले आहेत.


हेही वाचा – Coronavirus live update : जगभरात १२ लाख कोरोनाबाधित; तर ६४ हजार लोकांचा मृत्यू