Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी जगभरातून होतोय Lockdown चा शोध, देशात महाराष्ट्र अव्वल !

जगभरातून होतोय Lockdown चा शोध, देशात महाराष्ट्र अव्वल !

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रासह देशात कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता प्रत्येकाच्या मनात lockdown बाबतची एक धास्ती पुन्हा निर्माण झाली आहे. भारतात गेल्या २४ तासांमध्ये नव्या कोरोना रूग्णांचा आकडा हा ८९ हजार १२९ कोटींनी वाढला. त्यामध्ये ७१४ मृत्यूच्या आकड्याचीही नोंद आहे. जगभरातील नेटकरांनी गुगलवरही lockdown शब्द हा सातत्याने सर्च केला आहे. त्यामध्ये Lockdown बाबतची माहिती शोधण्यामध्ये सगळ्या पहिला क्रमांक हा दक्षिण आफ्रिकेचा तर त्यापाठोपाठ युनाटेड किंगडम आणि तिसरा क्रमांक भारताचा आहे. महत्वाचे म्हणजे भारतातील अनेक शहरांमधून lockdown बाबतची माहिती नेटकर शोधत आहेत.

lockdown world

- Advertisement -

जगभरातील शहरांमध्ये दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनमध्ये lockdown बाबतचा सर्च सर्वाधिक होताना दिसत आहे. भारतातून नवी मुंबईकर हे lockdown बाबतची माहिती शोधण्यामध्ये सर्वाधिक अग्रेसर आहेत. नवी मुंबईकरांचा lockdown ची माहिती शोधण्यामध्ये चौथा क्रमांक आहे, तर मुंबईकरांचा सहावा क्रमांक आहे. मुंबईपाठोपाठच लंडन, कोलकाता, दिल्ली आणि बंगळुरू येथून lockdown बाबतची माहिती नागरिकांकडून शोधली जात आहे. गेल्या १२ महिन्यांमध्ये lockdown हा शब्द गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक सर्च करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा lockdown ची उद्भवलेली स्थिती पाहता जगभरातून लोक आता लॉकडाऊनबाबतची माहिती शोधत आहेत.

 

locdown nation

लॉकडाऊनबाबत नेमक काय शोधतात नेटकर

- Advertisement -

जगभरातून lockdown बाबतची माहिती शोधतानाच नेटकरांकडून lockdown 4.0, tier 3 lockdown, lockdown roadmap, lockdown 5.0, lockdown easing, lockdown 4 guidelines अशा गोष्टी नेटकरांकडून लॉकडाऊनची माहिती शोधताना घेतली जात आहे.

lockdown बातम्या शोधण्यात नवी मुंबईकर आघाडीवर

जगभरातील शहरांमध्ये नवी मुंबईकरांकडूनच लॉकडाऊनच्या बातम्या शोधण्यात जगभरात नवी मुंबईकर अव्वल ठरले आहेत. जागतिक पातळीवर lockdown च्या सर्वाधिक बातम्या शोधणाऱ्या शहरांमध्ये नवी मुंबईचा क्रमांक पहिला आहे. नवी मुंबई पाठोपाठच केप टाऊन, गुरगाव, मुंबई, बंगळुरू या शरहांमधून लॉकडाऊनच्या बातम्यांचा शोध घेतला जात आहे. लॉकडाऊनच्या बातम्या शोधताना युजर्सकडून पुन्हा लॉकडाऊन होणार यासारख्या माहितीचा शोध घेतला जातो. त्यासोबतच आपआपल्या शहरांमधील लॉकडाऊन बाबतची माहितीही युजर्समार्फत शोधली जाते.

lockdown city mumbai

भारतात lockdown चा शोध कोणत्या शहरांमधून

लॉकडाऊनबाबतचा भारतातला शोध हा मिरा भायंदरमधून सर्वाधिक असा घेतला जात आहे. त्यापाठोपाठ ठाणे, नवी मुंबई, नॉएडा, पिंपरी चिंचवड या शहरांमधून लॉकडाऊनची माहिती शोधण्यात येत आहे. या शहरांमध्ये लॉकडाऊनबाबतची माहिती शोधतानाच नेटकरांकडून Lockdown 4.0, Lockdown 5.0, Lockdown 4.0 guidelines, Lockdown 4 guidelines अशा गोष्टींचा शोध घेतला जात आहे.

city


 

- Advertisement -