घरदेश-विदेशकेंद्र सरकारला मोठा दिलासा, जुलैमध्ये घाऊक महागाईत मोठी घट

केंद्र सरकारला मोठा दिलासा, जुलैमध्ये घाऊक महागाईत मोठी घट

Subscribe

महागाईलविरोधात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. देशातील किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाईतही घट होत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात घाऊक महागाईचा दर (2022) 13.93 टक्क्यांवर होता, जो जूनमध्ये 15.18 टक्क्यांवर पोहचला होता. त्यामुळे जुलै महिन्यातील घाऊत महागाईचे आकडे सरकारला दिलासा देणारे आहे.

यापूर्वी सलग तीन महिने घाऊक महागाईचा दर 15 टक्क्यांच्या वर होता. यात मेमध्ये याच दराने 15.88 टक्क्यांचा आकडा पार केला होता. जुलैमधील घाऊक महागाईचा हा दर मुख्यत्वे खनिज तेल, खाद्यपदार्थ, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, मूलभूत धातू, ऊर्जा, रसायने आणि संबंधित उत्पादनांच्या किमती घटल्याने दिलासाजनक पातळीवर असल्याचे म्हटले जातेय. सरकारने मंगळवारी ही आकडेवारी जाहीर माहिती दिली.

- Advertisement -

डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडच्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2022 मध्ये घाऊक महागाईचा दर 15.08 टक्क्यांपर्यंत वाढला होता. यानंतर मे महिन्यात घाऊक महागाईने तर नवा विक्रम नोंदवला होता. मे महिन्यात घाऊक महागाईचा दर 16.63 टक्क्यांवर होता. मात्र जूनमधील आकडेवारीत यात काहीशी घट दिसली. यात 1998 नंतर ही पहिलीच वेळ होती जेव्हा घाऊक महागाईचा दर 15 टक्क्यांच्या पुढे गेला.

दरम्यान घाऊक महागाई दर सलग 16 महिन्यांपासून 10 टक्क्यांच्या वर राहिला आहे. गेल्या पाच महिन्यांत जुलै 2022 मध्ये घाऊक महागाईचा सर्वात कमी दर नोंदवला गेला आहे.


दहशतवाद्यांकडून हिंदूंचे टार्गेट किंलिग सुरूच; 2 भावांवर गोळीबार, एकाचा मृत्यू


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -