घरताज्या घडामोडीWPI Inflation: एकीकडे कोरोनाचा कहर, दुसरीकडे ८ वर्षांतील सर्वात मोठी महागाई

WPI Inflation: एकीकडे कोरोनाचा कहर, दुसरीकडे ८ वर्षांतील सर्वात मोठी महागाई

Subscribe

मार्च महिन्यातील महागाई ही गेल्या ८ वर्षांतील सर्वात मोठी महागाई असल्याचे सांगण्यात आले आहे.

देशात कोरोनाच कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोकांची दयनीय परिस्थिती झाली आहे. त्यात आता महागाईचा सामनाही सर्वसामान्यांना करावा लागणार आहे. कारण आता किरकोळ ग्राहक किंमत निर्देशकांनी मोठा झटका दिला आहे. मार्च महिन्यात देशातील किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकात ७.३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च महिन्यातील महागाई ही गेल्या ८ वर्षांतील सर्वात मोठी महागाई असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळात कच्च्या तेलांच्या आणि धातुंच्या वाढत्या किंमतीमुळे दिवसेंदिवस महागाईही वाढत चालली आहे.

फेब्रुवारी महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक ४.१७ टक्के इतका होता. मात्र हाच निर्देशांक मार्च २०२० मध्ये ०.४२ टक्के इतका होता. सलग तिसऱ्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकात वाढ झाली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महागाईचा वार्षिक दर हा मार्च २०२० च्या तुलनेत मार्च २०२१ मध्ये ७.३९ टक्के आहे.

- Advertisement -

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे मार्च महिन्यात इंधन आणि विजेच्या किंमतींमध्ये महागाई झाली. या काळात इंधन आणि विजेत १०.२५टक्के महागाईचा दर नोंदवण्यात आला. मात्र हाच दर फेब्रुवारी माहिन्यात ०.५८ टक्के इतका होता. घाऊक किंमत निर्देशांकानुसार, याआधी ऑक्टोबर २०२१ मध्ये ७,४ टक्के इतका महागाईचा दर नोंदवण्यात आला होता.


हेही वाचा – सुएज कालव्याची कोंडी करणाऱ्या ‘एव्हर गिव्हन’ जहाजाला ठोठवला कोट्यावधीचा दंड

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -