Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Wrestlers Protest : जंतरमंतरवरील धक्काबुक्कीनंतर काँग्रेस कुस्तीपटूंच्या पाठीशी

Wrestlers Protest : जंतरमंतरवरील धक्काबुक्कीनंतर काँग्रेस कुस्तीपटूंच्या पाठीशी

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटूं दिल्लीतल्या जंतरमंतरवर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात धरणे आंदोलन करत आहेत. शांतपणे चाललेल्या या आंदोलनात बुधवारी (3 मे) रात्री कुस्तीपटू आणि दिल्ली पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. कुस्तीपटूंनी पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे, तर काँग्रेसनेही (Congress) दिल्ली पोलीस आणि गृहमंत्री अमित शहा कुस्तीपटूंशी गैरवर्तन करत असल्याचा आरोप केला आहे.

बुधवारी रात्री दारुच्या नशेत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे. दिल्लीत पडणाऱ्या पावसामुळे आम आदमी पार्टीचे नेते सोमनाथ भारती यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंसाठी फोल्डिंग बेड्स आणले होते, पण पोलिसांनी या बेड्सवर आक्षेप घेत कुस्तीपटूंना धक्काबुक्की केली आहे. दिल्ली पोलीस कर्मचारी आणि आंदोलक कुस्तीपटू यांच्यातील गोंधळाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. बजरंग पुनिया याने आरोप केला आहे की, पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली, त्यांना मारहाण केली. मात्र कुस्तीपटूंच्या आरोपांवर दिल्ली पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

- Advertisement -

काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा (deepender hooda) यांना घटनेची माहिती मिळताच ते कुस्तीपटूंना भेटण्यासाठी रात्री उशिरा जंतरमंतरवर पोहोचले, मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली. याची माहिती त्यांनी आज सकाळी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ते म्हणाले की, मी कुस्तीपटूंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जंतर-मंतरवर पोहोचलो, तेव्हा दिल्ली पोलिसांनी मला आंदोलनस्थळाच्या बाहेरून ताब्यात घेतले आणि वसंत विहार पोलीस स्टेशनमध्ये नेले.

दीपेंद्र हुड्डा यांच्या व्हिडीओ सध्या व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये दिल्ली पोलिसांनी दीपेंद्र हुडा यांना कलम 144 लागू असल्याची माहिती दिली. यावेळी हुड्डा यांनी मी एकटाच आत जातो, पीएसओला सोबत घेऊन जाणार नाही. मी फक्त ५ मिनिटांसाठी आत जातो.  मी आत जाऊन मुलींना भेटेन, त्यांच्या हिताची विचारपूस करेन आणि त्यांना हे आंदोलन शांततेत सुरू ठेवण्यास सांगेन, असे म्हणताना हुड्डा दिसत आहेत. त्यानंतर पोलिसांनी दीपेंद्र हुड्डा यांना ताब्यात घेतले.

- Advertisement -

आपल्या देशाच्या मुली
काँग्रेसने ट्विटरवर ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये साक्षी मलिक रडताना आणि तिची सहकारी विनेश फोगट तिचे सांत्वन करताना दिसत आहे. यावेळी काँग्रेसने लिहिले की, ‘या आपल्या देशाच्या मुली आहेत. त्यांनी देशाच्या सन्मानाचे रक्षण केले आणि देशासाठी अनेक पदके मिळवून दिली. असे म्हणताना त्यांनी गृहमंत्र्यांवर आरोप करताना म्हटले की, पोलीस आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कुस्तीपटूंशी गैरवर्तन केले आहे. दुसर्‍या एक ट्वीटमध्ये काँग्रसने लिहिले की, कुस्तीपटूंचा एकच चुक आहे की, ते शोषणाविरुद्ध आवाज उठवत आहेत. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदीजी, तुम्ही असा अन्याय का करत आहात? असा प्रश्नही विचारला आहे. काँग्रसने अजून एका ट्वीटमध्ये की, घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा स्पष्ट संदेश पक्षाने दिल्याचे ते म्हणाले.

खेळाडूंनी पोलिसांवर गैरवर्तनाचा आरोप केला
पोलिसांनी महिला कुस्तीपटूंशी गैरवर्तन केल्याचा आरोप कुस्तीपटूंनी लावला आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगट तिच्याशी झालेल्या गैरवर्तनाबद्दल सांगताना तिला रडू कोसळे. ती म्हणाली की, जर तुम्हाला आम्हाला मारायचे असेल तर मारा. हा दिवस पाहण्यासाठी आम्ही देशासाठी पदके जिंकली का? प्रत्येक पुरुषाला स्त्रियांशी गैरवर्तन करण्याचा अधिकार आहे का? असा तिने प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी तिने पोलिसांकडे बंदुका आहेत, ते आम्हाला मारू शकतात, अशी भीतीही बोलून दाखवली.

- Advertisment -