Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Wrestlers Protest: एक आरोप जरी सिद्ध झाला तर मी गळफास घेईन; बृजभूषण...

Wrestlers Protest: एक आरोप जरी सिद्ध झाला तर मी गळफास घेईन; बृजभूषण सिंह यांचा दावा

Subscribe

माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला तर मी गळफास घेईन, असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे.

देशातील पदक विजेत्या कुस्तीपटूंचे देशाची राजधानी दिल्लीत आंदोलन सुरूच आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू एकजुटीने उभे आहेत. या निदर्शनाला राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. दुसरीकडे खाप पंचायतींनीही रविवारी दिल्ली गाठून खेळाडूंना पाठिंबा दिला आहे. खाप पंचायतींसमोर आल्यानंतर ब्रृजभूषण शरण सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला तर मी गळफास घेईन, असे त्यांनी म्हटले आहे. केवळ काही खेळाडूंच्यावतीने आरोप केले जात असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. बाकीचे खेळाडू आमच्या पाठीशी आहेत. आंदोलक खेळाडूंना पाठिंबा देणाऱ्यांना त्यांनी संदेश देण्याचा प्रयत्न केला. ब्रृजभूषण शरण यांनी शनिवारी रात्री त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. पण त्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. आता ही क्लिप व्हायरल होत आहे. ( Wrestlers Protest Delhi Jantar Mantar An allegation has been proved Brij Bhushan Sharan Singh s claim )

व्हिडिओत काय म्हणाले ब्रृजभूषण?

ब्रृजभूषण शरण सिंह यांनी व्हिडीओ जारी करत म्हटले आहे की, माझ्यावर एकही आरोप सिद्ध झाला तर मी  फाशी घेईन. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कुस्तीपटूंचा एक गट दिल्लीत आंदोलन करत आहे. या प्रकरणाला आता वेग आला आहे. खाप पंचायतींच्या पैलवानांच्या पाठिंब्यानंतर वातावरण थोडे अधिकच तापले आहे. याशिवाय अनेक राजकीय पक्षांनीही या लढ्यात उडी घेतली आहे.

- Advertisement -

ब्रृजभूषण शरण सिंग यांच्यावर कुस्तीपटूंनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता त्यांनी व्हिडिओ जारी करून या संपूर्ण प्रकरणावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. माझ्यावरील एका कुस्तीपटूचा आरोप जर सिद्ध झाला तर मी गळफास घेईन असं ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे.

( हेही वाचा: देशातील गोंधळ सावरण्यास घटना अपुरी, संजय राऊत यांच्याकडून न्याययंत्रणेवर प्रश्नचिन्ह )

- Advertisement -

कुस्तीच्या संपाला पाठिंबा देणाऱ्या संघटनांना विनंती करण्याच्या स्वरात ब्रृजभूषण शरण सिंह म्हणाले, तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या आजूबाजूला कुस्ती खेळणारा कोणताही मुलगा, मग तो पुरुष पैलवान असो किंवा महिला कुस्तीपटू त्यांना हा ब्रिजभूषण खरच रावण आहे का हे त्याला खासगीत विचारा. तो दुष्ट आहे का? असं विचारा, तुम्हाला सत्य कळेल. हे एक, दोन, चार, सहा, 10 पैलवान सोडले तर कोणाला विचारा की, मी 11 वर्षांत देशाच्या कुस्तीसाठी काय केले नाही? आता आमच्यावर असे आरोप केले जात आहेत.

- Advertisment -