घरदेश-विदेशWrestlers Protest : महापंचायतीमध्ये कुस्तीपटू घेणार मोठा निर्णय; एकजूट दाखवण्याचा प्रयत्न

Wrestlers Protest : महापंचायतीमध्ये कुस्तीपटू घेणार मोठा निर्णय; एकजूट दाखवण्याचा प्रयत्न

Subscribe

नवी दिल्ली : खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात न्याय मागणाऱ्या कुस्तीपटूंनी आता शेवटचा प्रयत्न  करताना दिसणार आहेत. आजवर पंचायत-पंचायती खेळणाऱ्या शेतकरी संघटना एकत्र येत नसल्यामुळे कुस्तीपटूंनी आता स्वत: महापंचायत घेण्याचा निर्णय घेतला आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया याने मुंडलाना, गोहाना, सोनीपत येथील किसान युनियनच्या चधुनी गटाने आयोजित केलेल्या पंचायतीत लढाई शेवटपर्यंत घेऊन जाणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. (Wrestlers Trying to show unity will take a big decision in the Mahapanchayat)

शेतकरी संघटना आणि विरोधी नेत्यांनी कुस्तीगीपटूंच्या लढ्याला पाठिंबा दिला असला तरी या लढ्याला आतापर्यंत यश आलेले नाही. यावेळी शेतकरी नेते आणि पंचायतींनी पाठिंबा दर्शवला परंतु त्यांच्यामध्ये एकजूटी दिसून आली नाही. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या व्यासपीठांवरून निर्णय झाले, मात्र मोठा निर्णय घेण्यात आले नाही. त्यामुळे कुस्तीपटूंनी मोठा निर्णय घेतला आहे. शेतकरी गटातील कुस्तीपटूंना आंदोलनापासून दूर ठेवण्याची शक्यता आहे. शेतकरी चळवळीतच टिकैत गट आणि चाधुनी गटामध्ये मतमत्तांतरे आहेत. त्यामुळे ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात सुरू आंदोलनावर कोणताही परिणाम होऊ नये असे कुस्तीपटूंना वाटत आहे. त्यामुळे कुस्तीपटूंनी महापंचायत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

मुंडलाना आयोजित समर्थन पंचायतीमध्ये पोहोचलेल्या बजरंग पुनियाने मंचावर सांगितले की, समर्थ पंचायतीत सध्या कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. कारण मुंडलाना पंचायतीत मोठा निर्णय होऊ शकतो, असे आधीच सांगितले जात असल्यामुळे पुनियाच्या अशा वक्तव्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. मात्र, सर्वांनी संघटित होऊन पैलवानांच्या महापंचायतीला यावे. याठिकाणी सर्वजण मिळून एकमताने मोठा निर्णय घेऊ. एकाकी राहून लढाई जिंकता येत नाही. हा सन्मान आणि सन्मानाचा लढा आहे. या वक्तव्यानंतर उपस्थित सर्वांनी पुनियाच्या या निर्णयाचे कौतुक केले.

पोलिसांनी केलेल्याया कारवाईचा विनेश फोगट आणि साक्षी मलिकवर वाईट परिणाम
बजरंग पुनियाने मंचावर सांगितले की, 28 मे आणि 30 मेच्या घटनांनी साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्यावर वाईट परिणाम झाला. त्या दोघीं पूर्णपणे तुटून पडल्यामुळे त्यांच्या कुटुंबाना त्यांची काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे कुटुंबातील एक सदस्य नेहमीच त्यांच्यासोबत असतो आणि त्यांना सातत्याने प्रोत्साहन देत असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -