घरदेश-विदेशभारताच्या निर्णयाचा फटका कुस्तीला

भारताच्या निर्णयाचा फटका कुस्तीला

Subscribe

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नेमबाजी वर्ल्डकपसाठी पाकिस्तानमधून आलेल्या नेमबाजांचा व्हिसा नाकारला होता. मात्र, आता या भारताच्या निर्णयाचा फटका भारतीय कुस्तीला बसला आहे.

जम्मू-काश्मीर, पुलवामा येथे भारतीय सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले होते. या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानातील खेळाडूंना, अभिनेत्यांना, गायकांना बंदी घातली होती. या भारत-पाकिस्तानमधील राजकीय संघर्षाचा फटका भारतीय कुस्तीला बसला आहे. ज्युनियर आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भारताकडून काढून घेतले आहे. हा निर्णय जागतिक कुस्ती संघटनने (यूडब्ल्यूडब्ल्यू) दि. १७ रोजी घेतला आहे. ही स्पर्धा जुलैमध्ये रंगणार होती. या संघटनेने यापूर्वी त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या संस्थाना भारतीय कुस्ती फेडरेशनशी कोणताही संबंध किंवा व्यवहार ठेऊ नका असा फर्मान सोडला होता.

भारताच्या निर्णयाचा फटका

पुलवामा हल्ल्यानंतर नवी दिल्लीत पार पडलेल्या नेमबाजी वर्ल्डकपसाठी पाकिस्तानमधून आलेल्या नेमबाजांचा व्हिसा नाकारला होता. भारताच्या या निर्णयचा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून निंदा करण्यात आली होती. यामुळेच जागतिक कुस्ती संघटनेने हा निर्णय घेतला आहे आणि याचा फटका भारताच्या ज्युनियर कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला बसला आहे.

- Advertisement -

फेडरेशनने मांडली बाजू

भारतीय कुस्ती फेडरेशनचे सहाय्यक चिटणीस विनोद तोमर यांनी सांगितले की, मुळातच यावर्षीचे यजमानपद भारताकडे नव्हते. लेबननने माघार घेतल्यामुळे आशियाई कुस्तीसाठी भारताने घेतलेला तो पुढाकार होता. मात्र, आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यजमान भूषवण्याची संधी पुढच्यावर्षीही मिळणार नाही, असे दिसते आहे. तसेच दोन देशामधील राजकीय संघर्षाची झळ क्रिडा क्षेत्राला अशीच लागत राहीली, तर भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यजमानद मिळणार नाही, अशी भीती फेडरेशनला वाटत आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढावा लागेल. मात्र, निवडणुकींच्या अगोदर तोडगा निघेल असे वाटत नाही, असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -