घरCORONA UPDATEवुहान शहर ७६ दिवसांनंतर लॉकडाऊनमधून मुक्त

वुहान शहर ७६ दिवसांनंतर लॉकडाऊनमधून मुक्त

Subscribe

डिसेंबरपासून या शहरातून कोरोना विषाणूचा साथीचा रोग पसरण्यास सुरुवात झाली. २३ जानेवारीपासून हे शहर लॉकडाऊन होतं.

कोरोनाचा उद्रेक हा चीनच्या वुहान शहरातून झाला. त्यानंतर हे शहर पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आलं. चीनमध्ये कोरोनाचा कहर संपलेला आहे. त्यामुळे वुहान शहर तब्बल ७६ दिवसांनंतर लॉकडाऊनमधून मुक्त झालं आहे. गेल्या वर्षी डिसेंबरपासून या शहरातून कोरोना विषाणूचा साथीचा रोग पसरण्यास सुरुवात झाली. २३ जानेवारीपासून हे शहर लॉकडाऊन होतं. चीनमध्ये मृतांची संख्या ही वुहान शहरात सर्वात जास्त आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असलेलं हे शहर आता हळूहळू रुळावर येत आहे. या शहरात वाहतुकीची सुविधा सुरू झाली आहे. चीनने गेल्या महिन्यात वुहानमधून लॉकडाऊन काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. ११ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या शहराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. चीनमध्ये एकूण ८१ हजार ८०२ कोरोना रुग्णांपैकी ५० हजार लोक या शहरातून होते. एकूण ३,३३३ मृतांपैकी २५०० हून अधिक वुहानमध्ये मरण पावले.


हेही वाचा – जाहिराती थांबवून १२५० करोड वाचवा; सोनिया गांधींनी सरकारला दिल्या पाच सूचना

- Advertisement -

चीनमधील वुहान शहरात डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूची पहिली घटना घडली होती. इथल्या सीफूड आणि मांस बाजारामध्ये हा विषाणू प्राण्यांपासून माणसांमध्ये गेला आणि नंतर तो साथीच्या रोगात रुपांतर झाला. जगभरात १४ लाख ३० हजार ९८१ लोकांना या विषाणूची लागण झाली आहे आणि ८२ हजार ३६ लोक मरण पावले आहेत. वुहान शहर लॉकडाऊनमधून मुक्त झालं असलं तरीही येथे नियंत्रणाचे उपाय सुरूच आहेत. शहराने इतिहासातील सर्वात मोठं लॉकडाऊन पाहिलं आहे. २३ जानेवारीनंतर ते कठोर होत गेलं. विषाणूचा फैलाव वेगाने झाल्याने हुबेई प्रांतातही लॉकडाउन लागू करण्यात आला. ६ कोटी लोक ७६ दिवस घरात होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -