घरक्रीडाWWE सुपरस्टार 'केन' बनले महापौर

WWE सुपरस्टार ‘केन’ बनले महापौर

Subscribe

WWE सुपरस्टार ‘केन’ नावाने ओळखला जाणारा ‘ग्लेन जेकब्स’ हे नॉक्स देशातील टेनेसी येथील निवडणूक जिंकून महपौर बनला आहे. रिपब्लिकन पक्षाचे जेकब्स यांनी विरोधी डेमोक्रॅट लिंडा हॅनी यांना ६६ टक्के मतांनी हरवले आहे. निवडणुकीच्या प्राथमिक फेरीत या दोन्ही पक्षात मतांचा मोठा फरक होता. या विजयानंतर wwe ने या सुपस्टार चे अभिनंदनकरून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. केन महापौर पदावर आल्यामुळे त्यांच्या फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक फॅन्सनी त्यांना सोशल मीडियावरुन अभिनंदन केल आहे. तसेच रिंगणातील केनचे जुने फोटो ट्विट बरोबर पोस्ट केले आहेत. जेकब्स महापौराची निवडणुक जिंकणारे दुसरे सुपरस्टार ठरले. यापूर्वी जेसी वेंचुरा यांनी १९९१-९५ आणि १९९९-२००३ मध्ये गव्हर्नर निवडणुकीत यश मिळवलं होत.

- Advertisement -

जेकब्स यांनी १९९५ मध्ये WWF मध्ये खेळण्यास सुरुवात केली. WWE मध्ये कुस्ती रिंगमध्ये त्यांना ‘केन’ म्हणून ओळखल जाते. त्याचा भाऊ अंडरटेकर विरोधात कुस्ती जगभरात गाजली होती. WWE च्या इतिहासात ही फाईट खूप गाजली होती. केनने WWF मध्ये खेळतांना अनेक चॅम्पीयनशीप जिंकल्या. मागील अनेक वर्ष WWE मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर केन यांनी राजकीय निवडणूक लढवली आहे. केन ने आपली शेवटची मॅच जून महिन्यात खेळली होती.

‘केन’ यांना मिळलेल्या शुभेच्छा

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -