Bray Wyatt Passed Away : WWE म्हटले की, John Cena, Triple H, JN Shine, Batista, Rock, Hardy Brothers तसेच अन्य काही प्रसिद्ध अशी नाव आहेत. एकेकाळी भारतात WWE हा रेसलिंग शो सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम होता. भारतातील खली व अन्य काही रेसलर्सने सुद्धा या शो मध्ये सहभाग घेतला होता. परंतु, आता या शोमधील एका स्पर्धकाबाबत दुःखद बातमी समोर आली आहे. WWE मधील रेसलिंग चॅम्पियन असलेला Bray Wyatt याचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. रेसलर Triple H याने ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली. यामुळे ब्रे वॅटच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (WWE wrestling champion Bray Wyatt passed away at the age of 36)
हेही वाचा – Chandrayaan-3 : ब्रिटिश पत्रकारांची डोकी फिरली…, चांद्रयान-3 च्या यशावर उपस्थित केले प्रश्न
Bray Wyatt याचे खरे नाव विंडहैम रोटुंडा असे होते. तो गेल्या काही महिन्यांपासून गंभीर आजाराने त्रस्त होता. परंतु याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबियांकडून कोणालाही देण्यात आली नव्हती. परंतु आज (ता. 25 ऑगस्ट) आज अचानक त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. ब्रे वॅटच्या कुटुंबियांनी याबाबतची माहिती रेसलर ट्रिपल एच याला दिली. त्यानंतर त्याने याबद्दल ट्वीट करत ही माहिती सर्वांना दिली. खरं तर ब्रे वॅट हा WWE मधील एक उत्कृष्ट रेसलर होता. त्याच्यामध्ये आणि जॉन सीना मध्ये झालेला सामना हा सर्वांच्या लक्षात राहिलेला सामना आहे.
Just received a call from WWE Hall of Famer Mike Rotunda who informed us of the tragic news that our WWE family member for life Windham Rotunda – also known as Bray Wyatt – unexpectedly passed earlier today. Our thoughts are with his family and we ask that everyone respect their…
— Triple H (@TripleH) August 24, 2023
ब्रे वॅटचे आजोबा आणि वडील हे देखील WWE रेसलर होते. ब्रे वॅटच्या रुपाने डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये तिसरी पीढी उतरली होती. ब्लॅकजॅक मुलिगन हे त्याचे आजोबा होते, तर माईक रोटुंडा हे त्याचे वडील होते. WWE मध्ये त्याला वॅट फॅमिलीच्या लीडरच्या स्वरुपात दाखविण्यात आले होते. ज्यानंतर त्याने अनेक सामन्यांमधून स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेल्या वॅटने रेसलमेनिया 39 मध्ये भाग घेतला नव्हता.
ब्रे वॅट हा दोन वेळा WWE युनिव्हर्सल चॅम्पियन आणि एक वेळा WWE चॅम्पियन राहिला आहे. त्याने मॅट हार्डीसोबत एकदा WWE रॉ टॅग टीम चॅम्पियनशिपही जिंकली आहे. 2019 मध्ये, वॅटची WWE पुरुष रेसलर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली होती. त्याच्या निधनानंतर सोशल मीडियावरून त्याला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.