घरदेश-विदेशX accounts : विशिष्ट अकाऊंट्स बंद करण्याचे भारत सरकारचे आदेश, ट्विटरची नाराजी

X accounts : विशिष्ट अकाऊंट्स बंद करण्याचे भारत सरकारचे आदेश, ट्विटरची नाराजी

Subscribe

नवी दिल्ली : भारत सरकारने अलीकडेच X (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील काही अकाऊंट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. ट्विटरने असहमती दर्शवत सरकारचा हा आदेश मान्य केला आहे. भारत सरकारच्या आदेशानंतर काही ट्विटर अकाऊंट ब्लॉक किंवा निलंबित करत आहेत, परंतु आम्ही याच्याशी सहमत नाही. लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, असे Xच्या ग्लोबल गव्हर्नमेंट अफेयर्स टीमने एका पोस्टद्वारे म्हटले आहे.

- Advertisement -

“भारत सरकारने विशिष्ट अकाऊंट्स आणि पोस्टवर कारवाई करण्याचे कार्यकारी आदेश जारी केले आहेत. या अकाऊंट्सवर दंड आणि तुरुंगवास अशी कारवाई अधीन आहे. या आदेशांचे पालन करून हे अकाऊंट्स आणि पोस्ट केवळ भारतातच रोखल्या जातील; तथापि, आम्ही या कृतींशी असहमत आहोत आणि या पोस्टबाबत भाषण स्वातंत्र्याचा निकष लागला पाहिजे, असे आम्ही मानतो. आम्ही आमच्या धोरणांनुसार संबंधित युझर्सना या कारवाईची नोटीस देखील दिली आहे. कायदेशीर निर्बंधांमुळे, आम्ही कार्यकारी आदेश प्रकाशित करण्यास असर्थ आहोत, परंतु पारदर्शकतेच्या दृष्टीने ते सार्वजनिक करणे आवश्यक आहे, असे आम्हाला वाटते, असे Xच्या ग्लोबल गव्हर्नमेंट अफेयर्स टीमने म्हटले आहे.

हेही वाचा – Manipur Voilence : मैतेई समुदाय अनुसूचित जमातीच्या यादीतून बाहेर; न्यायालयाने केली दुरुस्ती

- Advertisement -

भारत सरकार सोशल मीडियावरील वादग्रस्त अकाऊंट किंवा सामाजिक सद्भावना बिघडवणारे अकाऊंट ब्लॉक करण्याचे आदेश जारी करते. यासंदर्भात, ट्विटरलाच जास्त आदेश दिले जातात. यापूर्वी सोशल मीडिया Xचे नाव ट्विटर असतानाही भारत सरकार असे आदेश जारी करत असे. याआधीही X ने सरकारी आदेशाचे पालन करून खाते ब्लॉक करण्याबाबत असहमती व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Chinese Hackers: चीनने भारताची गुप्त कागदपत्रे केली हॅक; पीएमओ-एअर इंडिया आणि रिलायन्सवरही हल्ले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -